IMPIMP

Pune News | नियोजित स्मारकाचे जागेत साजरी होणार अण्णा भाऊ साठेंचे जयंती; झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पाठपुराव्याला यश

by nagesh
pune news lokshahir annabhau sathe jayanti will be celebrated at the planned memorial site success in pursuit of slum security forces

पुणे / आळंदी : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune News | २४ जुलै २०२१ – आळंदी नगरपरिषद (Alandi Municipal Council) हद्दीतील स.नं .१२५ / ७ ब नगरपरिषद जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe) यांचे नियोजित स्मारक विकसित करण्यात येणार आहे. यासाठी आळंदी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ५१ नुसार स्मारकाचे कामास मान्यता देण्यात आली असल्याने यावर्षीची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट २०२१ ला नियोजित स्मारकाचे जागेत व्हावी अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट (Bhagwanrao Vairat, the founding president of the security forces) यांनी केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या प्रसंगी मोहम्मद शेख, सुरेखा भालेराव, निलमताई सोनवणे, प्रदीप पवार, दत्ता कांबळे, संतोष कदम,
सुनील भिसे, संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर लोहार, सोमनाथ साखरे, नानासाहेब मोरे, गणेश मुंजाळ, उद्धव कांबळे, सदाशिव साखरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या मागणीसाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव व अधिकाऱ्यांची भेट घेतली. अण्णा भाऊ साठेंचे स्मारक नियोजित जागेत व्हावे, पथारी धारकांचा सर्व्हे होवून त्यांची नोंद व्हावी, रमाई माता घरकुल योजनेतील लाभार्त्याना घरे मिळावीत.

अशा विविध मागण्या करण्यात आल्या व सविस्तर चर्चा करण्यात आली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या सर्व मागण्यांना नगरपरिषद मुख्याधिकारी जाधव व अधिकाऱ्यांनी एक मुखाने अनुमोदन देऊन
आळंदीतही साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची यावर्षीची जयंती आळंदी नगरपरिषद हद्दीतील स.नं .१२५ / ७ ब नगरपरिषद जागेत विकसित होणाऱ्या जागेत होईल अशी त्यांनी ग्वाही दिली.
याच बरोबर महाराष्ट्र राज्य कामगार पथारी सुरक्षा दलाच्या वतीने दीनदयाळ भाजी मंडईच्या शाखेचे भव्य
उदघाटन आळंदी देवाची या ठिकाणी करण्यात आले.
अशी माहिती झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी दिली.

Web Title : pune news lokshahir annabhau sathe jayanti will be celebrated at the planned memorial site success in pursuit of slum security forces

हे देखील वाचा:
Pune News | ‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’; स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात !

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 181 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mediqueen Mrs Maharashtra | मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ : रॉयल गटातून डॉ. रेवती राणे तर क्लासिकमधून डॉ. उज्वला बर्दापूरकर विजेत्या ठरल्या

Related Posts