IMPIMP

Sanjay Raut | शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याबद्दल पंतप्रधानांनी एकनाथ शिंदेंची पाठ थोपटली का? – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | pm modi praises eknath shinde for breaking shivsena sanjay raut targets cm eknath shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ थोपटली
का? असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विचारला आहे. रविवारी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची पाठ थोपटली. त्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना टोला लावला
आहे.

 

समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान झाला आहे. पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, बाळासाहेबांचा मान, सन्मान राखण्यासारखे वर्तन कुणीही करत नाही, केलेले नाही. उद्घाटनाच्या फ्लेक्समध्ये बाळासाहेबांचा फोटो चौथ्या क्रमांकावर होता. महाराष्ट्राने विकासाचे अकरा तारे दिले, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. ज्या अकरा ताऱ्यांसंदर्भात पंतप्रधानांनी भाषण केले, त्यातील पहिले दोन तारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे होत. त्यांचा पंतप्रधानांनी अपमान केला आहे, असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदुस्थानातील प्रखर सूर्य.
त्या सूर्यावर थुंकणारे लोक उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, असे राऊत म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा रविवारी नागपुरात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदी मान्यवर उपस्थित होते. शिवरायांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यपालांविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी महाविकास आघाडी करत आहे.

 

 

Web Title :- Sanjay Raut | pm modi praises eknath shinde for breaking shivsena sanjay raut targets cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Mrunmayee Deshpande | आता मृण्मयी देशपांडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर; ‘या’ मालिकेत झळकणार

Vilas Ujawane | अभिनेते डॉ. विलास उजवणेंची ‘या’ गंभीर आजाराशी झुंज; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Snehlata Girish Vasaikar | घराबाहेर पडताच स्नेहलता म्हणाली – ‘यंदाच्या पर्वाचा विजेता हाच स्पर्धक असावा’

AUS vs SA Test Series | पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा; ‘हा’ प्रमुख गोलंदाज टीममधून बाहेर

 

Related Posts