IMPIMP

Pune News | कारागृहातील भगिनींनी लुटला भोंडल्याचा आनंद

by nagesh
 Maharashtra Police | Educational special amnesty for inmates in state jails, reformation and rehabilitation activities for inmates

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | सध्या सर्वत्र नवरात्रीचा आनंदोत्सव सुरू आहे. स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना बाहेर सर्वत्र प्रत्येक दिवशी विविध रंगांच्या साड्या, भोंडला ,दांडिया अशा आनंदात मग्न आहेत. दुर्दैवाने आम्ही आमच्या कुटुंबियांपासून दूर आहोत. तरीपण आज कारागृहात आयोजित केलेल्या भोंडला च्या आणि दांडियाच्या निमित्ताने निमित्ताने आम्हाला आज घरात असल्यासारखे वाटत आहे. आमच्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही .आम्ही कारागृह प्रशासन ,भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मंडळ यांच्या प्रति कृतज्ञ आहोत. आम्ही इथून सुटून घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला कधीच विसरणार नाही कारण तुम्ही आज आमच्या आयुष्यात देवी मातेच्या आशीर्वादाने आनंदाची आनंदाचा वर्षाव केला आहे. अशा भावना येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील बंदीजन महिलांनी व्यक्त करत सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

निमित्त होते येरवडा कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान पुणे आणि आदर्श मंडळ यांच्या विद्यमाने बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी गेली सहा वर्षे कार्यरत असणाऱ्या प्रेरणा पथ या प्रकल्पांतर्गत महिला कारागृहातील भगिनींसाठी भोंडला आणि दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याचा आनंद महिला कारागृहातील महिलांनी लुटला.
कोविड ची नियमावली रद्द झाल्यानंतर दोन वर्षानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
बंदीजन महिलांनी यामध्ये स्वतः गाणी गाऊन दांडिया नृत्य केले. (Pune News)

 

याप्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे ,सामाजिक कार्यकर्ते नरेश मित्तल, संगीता मित्तल, विचारवंत कल्याणी संभूस, कारागृह अधीक्षक शिव शंकर पाटील, दौलतराव जाधव कारागृह प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी इंदुरकर, तुरुंग अधिकारी एन.जे. खिल्लारे, तुरुंगाधिकारी अश्विनी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

बंदीजन समुपदेशनासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगून यापुढेही अशा प्रकारचे कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबवण्यात येतील असे प्रतिपादन कारागृह उपमहानिरीक्षक सौ. स्वाती साठे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
येरवडा महिला कारागृह , भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मंडळ यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune News | Pune News navratri utsav 2022

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

Chandrasekhar Bawankule | एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ गद्दारीचा बदला घेतला, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray | महंत सुनिल महाराजांना शिवबंधन बांधताना उद्धव ठाकरेंचा संजय राठोडांना टोला, गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही

 

Related Posts