IMPIMP

Chandrasekhar Bawankule | एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ गद्दारीचा बदला घेतला, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला

by nagesh
Chandrashekhar Bawankule | 'Our clan is Hindutva, you are your clan..', Uddhav Thackeray's 'that' criticism of Bavan clans' counterattack (Video)

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन  एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी (MLA) शिवसेनत बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena party Chief Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या प्रत्येक भाषणात गद्दार या शब्दाचा वापर केला आहे. यावरुन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. भाजपसोबत युती तोडून उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला. मात्र उद्धव ठाकरेंनी केलेल्या गद्दारीचा बदला एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला, असा सणसणीत टोला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी लगावला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रशेकर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) अमरावती येथे पक्षप्रेवश आणि कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारावर चालणारे आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा सत्यानाश केला आहे. तर शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि संस्कार कायम ठेवण्यासाठी भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना शिवसेनेकडून काँग्रेस (Congress),
राष्ट्रवादी (NCP) सोबत आघाडीसाठी प्रस्ताव आसल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण
(Ashok Chavan) यांनी केला होता.
यामुळे कोंडीत सापडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मदतीला चंद्रशेखर बावनकुळे धावून आले.
अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर (Matoshree) शिजला असेल.
उद्धव ठाकरेंनीच तसं ठरवलं असेल आणि एकनाथ शिंदे निरोप घेऊन गेले असतील,
असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे.
तसेच राज्यात भाजप-शिवसेना सरकार (BJP-Shivsena Government) असताना एकनाथ शिंदे हे नेते नव्हते.
तेव्हा नेते उद्धव ठाकरेच होते.
त्यामुळे भाजपसोबत दगाबजाचा निर्णय उद्धव ठाकरेचांच असेल, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

 

 

Web Title :- Chandrasekhar Bawankule | chandrashekhar bawankule praises eknath shinde for his decision to came with bjp

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | महंत सुनिल महाराजांना शिवबंधन बांधताना उद्धव ठाकरेंचा संजय राठोडांना टोला, गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही

Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी खोडून काढले धनंजय मुंडेंचे वक्तव्य, म्हणाल्या – रक्ताची नातीच कधीच संपत नसतात, मी कुणाशीही…

MP Supriya Sule | RSS वर बंदीची मागणी कोणी केली असेल तर…, खा. सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य

 

Related Posts