IMPIMP

Pune News | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच!; भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

by nagesh
Pune News | The official honor of 'Maharashtra Kesari' goes to 'Sanskrit Pratishthan'!; Letter of responsibility for organization given by Wrestling Federation of India; Information of Muralidhar Mohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune News | महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन
करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण लवकरात लवकर कळवण्याच्या सूचना या पत्रात कुस्ती महासंघाने दिल्या आहेत. (Pune News)

 

नवी दिल्ली येथे बृजभूषण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके समवेत होते. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘महाराष्ट्र केसरी’ अधिकृतपणे कोण भरवणार याबाबत संभ्रम होता. मात्र, कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, महासंघाच्या अस्थायी समितीचे पदाधिकारी यासंदर्भातील कार्यभार पाहत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र केसरी’चे जनक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबियांकडे ‘महाराष्ट्र केसरी’चे आयोजन येणे, ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे.
प्रत्येकाच्या आठवणीत राहील आणि कुस्तीला आणखी उंचीवर नेता येईल,
अशा प्रकारचे आयोजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल.
लवकरच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाईल,”
असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. (Pune News)

 

ब्रिजभूषण सिंग म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे.
११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली जावी.
या स्पर्धेसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत. शाहू महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले.
त्यातून अनेक कुस्तीगीर घडले. तालीम संघ मोठ्या प्रमाणावर आहेत.
तेव्हा ही स्पर्धा चांगल्या स्वरूपात पार पडेल.”

 

Web Title :- Pune News | The official honor of ‘Maharashtra Kesari’ goes to ‘Sanskrit Pratishthan’!; Letter of responsibility for organization given by Wrestling Federation of India; Information of Muralidhar Mohol

 

हे देखील वाचा :

Nashik Accident | नाशिकमध्ये अपघातांचे सत्र सुरूच; सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन गाड्यांचा विचित्र अपघात

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक महेश थोरात व शिरीष लोढा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Shinde Group MLA Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब ठाकरे असतानासुद्धा शिवसेनेला 100 जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे… ‘ – आमदार संजय गायकवाड

Indrani Balan Winter T-20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; माणिकचंद ऑक्सिरीच, वालेकर स्पोर्ट्स संघांची विजयी कामगिरी !!

 

Related Posts