IMPIMP

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक महेश थोरात व शिरीष लोढा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | A case of fraud has been registered against builders Mahesh Thorat and Shirish Lodha in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | बांधलेल्या इमारतीची मजुरी व जीएसटी न देता एका बिल्डरची दीड कोटी रुपयांची फसवणूक
(Fraud) केल्याप्रकरणी दोन बिल्डरवर (Builder) फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) 15 मे 2017 ते 8
डिसेंबर 2022 या कालावधीत मांजरी बु. येथील अथर्वसृष्टी (Atharva Shrishti) येथे घडला आहे.

 

अथर्व बिल्डकॉनचे (Atharva Buildcon) बिल्डर महेश एकनाथ थोरात Mahesh Eknath Thorat (वय 41 रा. मांजरी खु), शिरीष निहालचंद लोढा Shirish Nihalchand Lodha (वय 39, रा. गुलटेकडी, पुणे) यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) आयपीसी 420, 406, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण शिवाजी कुसाळकर Pravin Shivaji Kusalkar (वय 44, रा. सातवसाहेब वाडाजवळ, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून, आरोपी महेश थोरात त्यांच्या ओळखीचे आहेत. महेश थोरात यांनी फिर्यादी यांना अथर्वसृष्टी येथील इमारत बांधण्याचे काम दिले होते. त्यानुसार फिर्यादी यांनी इमारतीचे काम केले. कामाचे पैसे मागण्यासाठी फिर्य़ादी हे थोरात यांच्याकडे गेले असता, त्यांनी पैसे देतो असे सांगितले. मात्र, त्याच दिवशी थोरात यांनी गुन्हे शाखा युनिट सहाकडे (Crime Branch Unit-6) फिर्यादी यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली.
त्यानंतर त्यांच्यामध्ये समजुतीचा करारनामा (MOU) झाला.
त्यानुसार आरोपींनी एक महिन्याच्या आत फिर्यादी यांना 1 कोटी 53 लाख रुपये कामाची मजुरी व जीएसटीची रक्कम द्यायची होती.
परंतु आरोपींनी फिर्य़ादी यांचे पैसे न देता जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill)
देऊन खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A case of fraud has been registered against builders Mahesh Thorat and Shirish Lodha in Pune

 

हे देखील वाचा :

Shinde Group MLA Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब ठाकरे असतानासुद्धा शिवसेनेला 100 जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे… ‘ – आमदार संजय गायकवाड

Indrani Balan Winter T-20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; माणिकचंद ऑक्सिरीच, वालेकर स्पोर्ट्स संघांची विजयी कामगिरी !!

ENG vs PAK 2nd Test | अबरार अहमदने पदार्पणातच रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज

Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; 23 जणांवर कारवाई

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

 

Related Posts