IMPIMP

Pune Crime | लोणी काळभोर परिसरातील पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा, 10 जणांना अटक

by nagesh
Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) बेकायदेशीर पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकला आहे. पोलिसांनी जुगार घेणारे आणि खेळणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीतील गायकवाड वस्ती येथे (Pune Crime) करण्यात आली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लक्ष्मण संभाजी जगताप (वय – 60 रा. माळीमळा, लोणी काळभोर), मंगेश कुंडलीक शिंदे (वय – 27), मल्हारी पोपट शिंदे (वय – 26 रा. सातववाडी, हडपसर), सचिन उत्तम मालपानी (वय – 35 रा. लोणीगांव), राहुल बाबासाहेब गायकवाड (वय – 40 रा. कोलवाडी, ता. हवेली), शकिल अहमद शेख (वय – 35 रा. लोणी स्टेशन), अन्सर अली झीया उद्दीन कोरबु (रा. लोणी स्टेशन), अक्षय बळीराम यलगुंडे (वय – 33 रा. लोणी काळभोर), संदीप रामचंद्र लांडगे (वय – 32 रा. घोरपडेगाव, पुणे), परमेश्वर गोविंद कुसाळकर (वय – 34 रा. माळीमळा) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस अंमलदार यांना गायकवाड वस्ती येथे बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला असता त्याठिकाणी काही जण 52 पत्त्यांचा रम्मी हा जुगार खेळत (Rummy Gambling) असल्याचे दिसून आले. पोलिसांनी (Pune Police) जुगार घेणारे व जुगार खेळणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेऊन 10 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्यांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम (Maharashtra Gambling Prohibition Act) कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar),
पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Shridhar Khadke), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे,
प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Social security Cell raided gambling den in Loni Kalbhor area 10 people were arrested

 

हे देखील वाचा :

Vitamin-C Deficiency | व्हिटॅमिन-सी च्या कमतरतेमुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, अशी भरून काढा कमतरता!

CM Eknath Shinde | बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कुणी केली मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Pune Metro | शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार, दीपक केसरकर यांची माहिती

 

Related Posts