IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : मावळमधील बाबाराजे देशमुखला 70 लाखाच्या खंडणीप्रकरणी अटक

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime News | Babaraj Deshmukh from Maval arrested in connection with extortion of 70 lakh

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | समाज माध्यमांवर सदैव प्रकाशझोतात (Active On Social Media) असणार्‍या मावळमधील प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख Prashant Alias Babaraje Ganpatrao Deshmukh (33, रा. मु.पो. बेबडओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) याला शिरगाव पोलिसांनी (Shirgaon Police Station) अटक केली आहे (Babaraje Deshmukh Arrested). बाबाराजे देशमुख याच्याविरूध्द 70 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करून 5 लाख रूपयांची खंडणी (Extortion Case) घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल First Information Report (FIR) करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील एका 48 वर्षीय सिव्हील इंजिनियरने शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी बाबाराजे देशमुख याच्याविरूध्द भादंवि कलम 406,420, 386, 387 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्हा सन 2013 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान वेळावेळी मावळ (Maval Taluka) तालुक्यातील बेबडओव्हळ येथील गट नंबर 196 मध्ये घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबाराजे देशमुखची गट नंबर 196 मध्ये मौजे बेबडओव्हळ (ता. मावळ)
येथे असणारी 5 एकर मिळकत ही वनीकरण विभागात समाविष्ट आहे. त्या मिळकतीचे प्लॉटिंग होत नाही
याबाबत देशमुखला माहिती आहे. तरीदेखील त्याने त्या मिळकतीमधील 25 गुंठे जागेचा व्यवहार फिर्यादी
सिव्हील इंजिनियरसोबत केला. त्याचा मोबदला म्हणून 25 लाख रूपये घेतले. त्या जागेचे फिर्यादीच्या नावाने खरेदीखत करून न देता व घेतलेले 25 लाख रूपये फिर्यादीला परत न करता त्यांची फसवणूक (Cheating Case) केली.
सदरील जागेचे खरेदीखत करावयाचे असल्यास आणखी 70 लाख रूपये द्यावे लागतील असे म्हणून त्यांच्याकडे
70 लाखाच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार केल्यास फिर्यादीस जीवे
मारण्याची धमकी दिली आणि 5 लाख रूपये खंडणी म्हणून घेतले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बाबाराजे देशमुख याला अटक केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे (PSI Kamble) करीत आहेत.

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime News | Babaraj Deshmukh from Maval arrested in connection with extortion of 70 lakh

Related Posts