IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | मुलगा होत नसल्याने विवाहितेचा छळ, महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीला अटक, चाकण परिसरातील घटना

Suicide

चाकण : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | चार मुली झाल्या परंतु मुलगा होत नसल्याने सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून 36 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी (PCPC Police) पती, सासु-सासरे यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन पतीला अटक केली आहे. ही घटना मंगळवार (दि.2) दुपारी एकच्या सुमारास खंडोबा माळ चाकण येथील गुप्ता चाळीत घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ शाम मोहन लंचु गुप्ता (वय-28 रा. मु.पो. भिती चौक भिटी ता.जि. मऊ उत्तर प्रदेश) याने चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मयत महिलेचा पती सचिन सुभाष गुप्ता, सासरे सुभाष देवनारायण गुप्ता, सासु (सर्व रा. खंडोबामाळ, गुप्ता चाळ, चाकण) यांच्यावर आयपीसी 306, 498(अ), 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण हिला आरोपींनी माहेरून पैसे आणण्यासाठी त्रास दिला.
त्यानंतर चार मुली झाल्या पण मुलगा झाला नाही या कारणावरून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.
सासरच्या मंडळींच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
चाकण पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक (Arrest) केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मडके (PSI Madke) करीत आहेत.