Pune Pimpri Chinchwad Crime News | पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन मांडीचा घेतला चावा, मुंढवा परिसरातील घटना
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | डायल 112 कॉलची पुर्तता करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला (Pune Police) धक्काबुक्की करुन मांडीचा चावा घेऊन जखमी केले. तसेच अश्लील शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.4) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घोरपडी गावातील सेंट जोसेफ स्कुलजवळ (St. Joseph’s School) असलेल्या आगवाली चाळीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबत पोलीस शिपाई किरण विठ्ठल बनसोडे (Police Constable Kiran Vitthal Bansode) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सचिन प्रकाश काकडे (रा. आगवाली चाळ नं.1, घोरपडी गाव) याच्यावर आयपीसी 353, 332, 323, 186, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन काकडे आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाले होते.
त्यामुळे आरोपीच्या पत्नीने डायल 112 वर फोन करुन तक्रार केली होती. डायल 112 कॉलची पुर्तता करण्यासाठी
पोलीस शिपाई किरण बनसोडे हे गेले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्याकडे पाहून ‘तु इथे कशाला आला तुला
कोणी बोलावले’ असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच पोलिसांच्या नावाने अश्लील शिवीगाळ करुन
फिर्यादी यांची गचांडी पकडली. ‘माझ्या विरुद्ध तक्रार नोदवतो काय तुला बघुन घेतो’ असे बोलून किरण बनसोडे
यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. त्यावेळी बनसोडे यांनी आरोपीला बाजूला केले असता तो खाली पडला.
त्याने किरण बनसोडे यांच्या मांडीचा चावा घेऊन जखमी केले. आरोपीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग, दोन महिलांसह तिघांवर FIR; मुंढवा परिसरातील प्रकार
- Sharad Mohol Murder Case | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा गोळया झाडून खून करणार्यांच्या काही तासात गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, आरोपींमध्ये 2 वकिलांचा समावेश (व्हिडीओ)
- FIR On BJP MLA Sunil Kamble | सावरणार्याच्याच कानशिलात मारली; भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल
Comments are closed.