IMPIMP

Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये अवैधरित्या जनावरांना कत्तलखान्यात (Slaughter) घेऊन जाणारा टेम्पो (Carrying Animals) हिंजवडी पोलिसांनी पकडून तीन जनावरांची सुटका केली. पोलिसांनी ही कारवाई (Pune Pimpri Crime) सुस खिंडीजवळ शनिवारी (दि.3) रात्री बाराच्या सुमारास केली. याप्रकरणी टेम्पो चालकावर IPC महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (Maharashtra Animal Protection Act), प्राण्याचा छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Cruelty to Animals Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुग्रिव रोहिदास शिंदे Sugriva Rohidas Shinde (वय-39 रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यातील (Hinjewadi Police Station) पोलीस हवालदार शंकर सखाराम उत्तेकर (Shankar Sakharam Uttekar) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या टेम्पोमधून (एमएच 14 ई एम 4728) तीन जनावरांची वाहतूक करत होता.
सूस खिंडीजवळ टेम्पो थांबवून तपासणी केली.
त्यावेळी टेम्पोमध्ये दाटीवाटीने एक बैल, गाय व वासरु अशी 3 जनावरे दोरीने बांधल्याचे आढळून आले. जनावरांबाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चालकाची सखोल चौकशी केली.
चौकशीमध्ये ही जनावरे कोंढवा (kondhwa) येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे आरोपीने सांगितले.
पोलिसांनी 1 लाख रुपयांचा टेम्पो जप्त करुन 45 हजार रुपयांच्या तीन जनावरांची सुटका केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे (API Ram Gomare) करीत आहेत.

 

Web Title: Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत मागील आठवड्यातील घसरणीनंतर आज दिसत आहे तेजी, जाणून घ्या नवीन दर

Cyrus Mistry Car Accident | अपघातात सायरस मिस्त्रींचा मृत्यू, मर्सिडीज चालवणार्‍या ‘अनाहिता पंडोले ‘ कोण आहेत?

Pune Crime | जेष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करुन मोबाईल नेला हिसकावून; खराडी येथील सकाळची घटना

 

Related Posts