IMPIMP

Pune Crime | जेष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करुन मोबाईल नेला हिसकावून; खराडी येथील सकाळची घटना

by nagesh
Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | मॉर्निग वॉकला जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकाने मोबाईल हिसकाविणार्‍याला पकडले. तेव्हा
मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांच्यावर कोयत्याने वार (Attempt To Murder) करुन मोबाईल हिसकावून नेला. ही घटना
खराडीमधील (Kharadi Area) चौधरी वस्तीतील टस्कन सोसायटीचे मेनगेटसमोर रविवारी सकाळी ६ वाजता घडली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत खराडीमध्ये राहणार्‍या एका ६० वर्षाच्या नागरिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२१/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते. यावेळी त्यांनी मोबाईल कानाला लावून बातम्या ऐकत होते. त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरुन तिघे जण आले. त्यांच्यातील मध्ये बसलेल्याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी त्यास हिसका देऊन ओढले. त्यामुळे मोटारसायकलवरील तिघे जण रस्त्यावर पडले. फिर्यादी यांनी मोबाईल हिसकाविणार्‍याला पकडले. तेव्हा मोटारसायकलवरील दोघांनी त्यांच्याकडील कोयत्याने फिर्यादी यांच्या हातावर वार करुन त्यांना जखमी केले.
त्यांच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला.
पोलीस निरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title:  Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या किरण भुमकर, अमर भुमकर यांच्यावर FIR

Pune Crime | सोन्याच्या चीपचा मोह पडला महागात; सोन्याच्या चीपसाठी मंगळसुत्र केले चोरट्यांच्या हवाली

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati | भाऊ रंगारी गणपती बाप्पाचरणी अलोट गर्दी ; बाप्पाची मूर्ती ठरतेय भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

CBSE Digilocker Marksheet | सीबीएसईने म्हटले – डिजिलॉकरवर जारी मार्कशीटला कायदेशीर मान्यता, उच्च संस्था देऊ शकत नाहीत प्रवेशाला नकार

 

Related Posts