IMPIMP

Pune Pimpri Crime | विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या महिलेच्या त्रासाला वैतागून प्रियकराची आत्महत्या, वाकड परिसरातील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | lover commits suicide after being harassed by a woman who has extramarital affairs vakad police pcmc

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) ठेवलेल्या महिलेच्या त्रासाला वैतागून प्रियकराने (Lover) आत्महत्या (Commits Suicide) केल्याची घटना वाकड परिसरात घडली आहे. दुसऱ्या कोणासोबत लग्न करायचं नाही. तू माझ्या सोबत येऊन रहा अन्यथा पोलिसांकडे तक्रार (Pune Pimpri Crime) करेन अशी धमकी विवाहित महिलेने प्रियकर विकास विलास माळवे Vikas Vilas Malwe (वय-27) याला दिली. महिलेच्या जाचाला कंटाळून विकास याने शनिवारी (दि.12) सकाळी 8.30 च्या सुमारास एका शेतात नायलॉन दोरीने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी (Suicide Note) लिहून ठेवली असून महिला जाच करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी विकास माळवे याच्या 50 वर्षाच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) सोमवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 33 वर्षाच्या विवाहित महिलेवर आयपीसी 306 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विकास आणि 33 वर्षीय आरोपी महिला यांच्यामध्ये मागील एक वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते.
महिलेचा पती मुंबईत असून तो पत्नीसोबत राहत नाही. महिलेला दोन मुली आहेत.
मयत विकास हा छोटा व्यवसाय करुन त्याचे घर चालवत होता. तर आरोपी महिला ही त्याच्याकडे तिचा संसार चालवण्यासाठी पैशांची मागणी करत होती.
आरोपी महिला मागील एक वर्षापासून विकासकडे लग्न करण्याची मागणी करत होती.
तसेच इतर कोणासोबत लग्न केले तर पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत होती.
महिलेच्या जाचाला वैतागून विकास याने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभय दाभाडे (API Abhay Dabhade) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | lover commits suicide after being harassed by a woman who has extramarital affairs vakad police pcmc

 

हे देखील वाचा :

Raju Shetti | बदल्यांच्या नावाखाली मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीची महिला आयोगात धाव

Maharashtra Politics | इथेही महाराष्ट्र एक नंबर; आजी माजी आमदार आणि खासदारांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा अहवाल

 

Related Posts