IMPIMP

Maharashtra Politics | इथेही महाराष्ट्र एक नंबर; आजी माजी आमदार आणि खासदारांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा अहवाल

by nagesh
Maharashtra Local Body Election | postponement of local self government elections the hearing will be held in three weeks

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ज्येष्ठ वकील विजय हंसरिया (Vijay hansaria) उच्च न्यायालयांकडून (High Court) देशातील विविध राज्यांतील आजी माजी आमदार आणि खासदारांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा एक अहवाल (Report on cases against People’s Representative) सुप्रीम कोर्टात सादर करणार आहेत. दरम्यान, त्याआधी महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) आकडेवारीतून धक्कादायक बाब समोर येत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Politics) माजी आजी आमदार (MLA) आणि खासदारांच्या (MP) विरोधातील सध्याच्या गुन्हेगारी खटल्यांची गेल्या तीन वर्षांपूर्वीच्या आकड्यांशी तुलना करता जास्त खटले प्रलंबित राहिले आहेत. तब्बल 21 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे. (Criminal Cases Against Maharashtra MLA MP)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उच्च न्यायालयांच्या अहवालानुसार डिसेंबर, 2018 मध्ये प्रलंबित खटल्यांचा आकडा 4,122 इतका होता. तो डिसेंबर, 2021 मध्ये 4,984 पर्यंत गेला आहे. तसेच या यादीत संपूर्ण भारतात महाराष्ट्र (Maharshtra Politics) पहिल्या क्रमांकावर आहे. या अहवालात मिळालेल्या आकडेवारीनुसार, तब्बल 1,899 प्रकरणे पाच वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत, तर 1,475 प्रकरणे 2-5 वर्षे आणि दोन वर्षांपेक्षा कमी 1,599 प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच, ऑक्टोबर 2018 नंतर फास्ट ट्रॅक न्यायालयात 2,775 प्रकरणांचा निकाल लागला आहे.

 

‘या यादीत उत्तर प्रदेश (UP), राजस्थान (Rajasthan), बिहार(Bihar), तेलंगणा(Telangana),
छत्तीसगड (Chhattisgarh), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि जम्मू आणि काश्मीर
(Jammu and Kashmir) या सात प्रमुख उच्च न्यायालयांनी त्यांच्याशी संबंधित राज्ये व केंद्रशासित
प्रदेशांबद्दल माहिती दिलेली नाही. उदाहरणार्थ, 1979 ते 2019 दरम्यान यूपीचे नेते अतीक अहमद यांच्यावर
106 गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 17 हत्येच्या आरोपाचे, 12 यूपी गँगस्टर
कायद्यांतर्गत आणि आठ यूपी गुंडगिरी केल्याच्या खटले कायद्यांतर्गत होते. दरम्यान अहमद यांनी उत्तर
प्रदेशमध्ये तुरुंगात असतानाही मोठे गुन्हे केल्याने त्यांना सुप्रीम कोर्टाने 2019 मध्ये गुजरातच्या तुरुंगात
हलवण्याचे आदेश दिले होते. पण उत्तर प्रदेश हाय कोर्टाचे कोणतीही माहिती दिलेली नाही.’ अशी माहिती
हंसरिया यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | rise in pending criminal cases against mla and mps maharashtra tops

 

हे देखील वाचा :

Alia Bhatt | आलियाने शेअर केला मुलीच्या जन्मानंतरचा पहिला फोटो, पण लोकांनी केली ‘ही’ मागणी

Pune Crime | बोपदेव घाट परिसरात लुटमार करणारा सराईत गुन्हेगार स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 85 जणांवर कारवाई

Bhumi Pednekar | “वाह, काय ती सुंदरता..”, भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो पाहुन होताल घायाळ, पहा फोटो एका क्लिकवर

 

Related Posts