IMPIMP

Pune Pimpri Crime News | क्रेडिट कार्ड एप्लीकेशन डाउनलोड करणं पडलं महागात, सायबर चोरट्यांनी महिलेचं बँक खातं केलं ‘साफ’; सांगवी परिसरातील घटना

by sachinsitapure
Cheatinh Fraud Case

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime News | क्रेडिट कार्डचे (Credit Card) हिडन चार्जेस न लागण्यासाठी मोबाईलमध्ये एप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) महिलेच्या बँक खात्यातून 89 हजार 143 रुपये परस्पर काढून फसवणूक (Cheatinh Fraud Case) केली. हा प्रकार शुक्रवारी (दि.24) सायंकाळी चारच्या सुमारास महिलेच्या सांगवी येथील घरात ऑनलाईन घडला. (Pune Pimpri Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) शनिवारी (दि.25) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार 90387XXXXX, 82529XXXXX मोबाईल धारकांवर आयपीसी 406, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी घरी असताना त्यांना दोन अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आले.
फोन करणाऱ्या व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याची बतावणी करुन महिलेचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी यांच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डला हिडन चार्जेस न लागण्यासाठी ICICI बँक क्रेडिट एप्लीकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने एप्लीकेशन डाउनलोड केले असता त्यांच्या बँक खात्यातून 89 हजार 143 रुपये काढून घेत फसवणूक केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Related Posts