IMPIMP

Pune Accident News | आयशर टेम्पोची दुचाकीला धडक, 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; चाकण मधील घटना

by sachinsitapure
Accident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Accident News | आयशर टेम्पोची दुचाकीला धडक बसून 11 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. हा अपघात (Pune Accident News) शनिवारी (दि.25) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील तळेगाव चौकात झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

समर्थ सुनील लोंढे (वय-11 रा. रिदोरी, ता. माजलगाव, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या लहान मुलाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालक अमोल लक्ष्मण वाघमारे (वय-23 रा. वाघाळा, राहूल नगर, कौठा, जि. नांदेड) याच्यावर आयपीसी 279, 337, 338, 304(अ), 427 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मयत समर्थ याचे मामा दत्ता सखाराम जगताप (वय-32 रा. डोंगर वस्ती निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता जगताप हे भाचा समर्थ व मुलगी राजनंदनी यांना घेऊन दुचाकीवरुन (एमएच 14 जे.एस 2942) चाकण बस स्टँडकडे जात होते. तळेगाव चौकातील सिग्नलला ते थांबले होते.
सिग्नल सुटल्यानंतर ते दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना पुणे-नाशिक महामार्गावरून (Pune-Nashik Highway)
जाणाऱ्या आयशर टेम्पोने (एमएच 24 ए.यु. 7207) जगताप यांच्या दुचाकीला धडक दिली.
यामध्ये जगताप यांचा भाचा समर्थ हा टेम्पोखाली आल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Related Posts