IMPIMP

Pune Police | मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना पुणे शहर पोलिसांकडून मानवंदना

by sachinsitapure
Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police | मुंबईत झालेल्या 26/11 च्या घटनेला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात (26/11 Terrorist Attack) मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police Force) जे शहीद झालेत त्यांना मानवंदना देण्यात आली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी आणि जवानांच्या स्मरणार्थ पुणे पोलीस (Pune Police) व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने सारसबागेत सकाळी साडेनऊ वाजता या शहीदांना मानवंदना देण्यात आली. पोलीस स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहिदांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धेचा व लहान मुलांना खाऊ वाटपाचे आयोजन करण्यात आले.

26/11 हल्ल्यातील शहिद जवानांना पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Patil), पोलीस उपायुक्त संभाजी पाटील (DCP Sambhaji Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (IPS Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त विशेष शाखा आर. राजा तसेच कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगांवकर (ACP Narayan Shirgaonkar), स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे (Sr PI Sunil Zaware), पोलीस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव याच्यासह पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार यांनी शहिदांना मानवंदना दिली.
पोलीस मुख्यालयाच्या वतीने शहिदांना सलामी देण्यात आली.
तसेच सेवा मित्र मंडळाचे पुणे अध्यक्ष शिरीष मोहिते व पदाधिकारी
तसेच शहरातील इतर मान्यवरांसह चित्रकला स्पर्धेकरिता आलेले विद्यार्थी व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुणे शहर पोलीस (Pune Police) व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने
पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत 7 ते 8 हजार वेग-वेगळ्या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी वेग-वेगळ्या विषयावर चित्र काढली.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व बक्षिस वितरण करुन त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Related Posts