IMPIMP

Pune Pimpri Crime | ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरून पिंपरी कॅम्पमध्ये कपडे विक्री

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ब्रँडेड कंपन्यांचे लोगो वापरून पिंपरी कॅम्प येथे बनावट (Pune Pimpri Crime) कपडे विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी कॅम्प येथील पाच दुकानदारांवर कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला (Pune Pimpri Crime) आहे. गुरुवारी (दि. 1) ही कारवाई करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणी राहुल सुरेश जयसिंघानी (29, रा. पिंपळे सौदागर), राजेश टेकचंद्र जयसिंघानी (52, रा. काळेवाडी), दिलीप नेनुमल खतिजा (52, रा. पिंपरी कॅम्प), राजेश गुरुदासमल तेजवानी (52, रा. काळेवाडी), धीरज किशोर जयसिंघानी (31, रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांची नावे आहेत. याप्रकरणी दिलीपकुमार राधेशाम स्वर्णकार (39, रा. मुंबई) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी स्वर्णकार हे पुमा कंपनीत नोकरीला आहेत.
पिंपरी कॅम्पमधील काही दुकानांमध्ये पुमा कंपनीचा लोगो वापरून काही बनावट कपड्यांची विक्री होत आहे, अशी माहिती त्यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. पिंपरी पोलिसांनी वरील दुकानदारांकडून 10 लाख 99 हजारांचे
कपडे जप्त केले आहेत. पिंपरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | sale of fake clothes under branded name puma pimpri chinchwad are

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Pune Crime | वॉटर प्युरिफायर मटेरियल परस्पर विकून कंपनीची 48 लाखांची फसवणूक; वाघोली येथील प्रकार

Pune Crime | स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; पुण्यातील घटना

 

Related Posts