IMPIMP

Pune Crime | स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; पुण्यातील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime | Raped a young woman by luring her to marry, threatened to cut her into 24 pieces for abortion; Shocking type in wakad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | दोन लग्न झालेली असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 24 वर्षांच्या तरुणीला लग्नाचे
आमिष दाखवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल (Pune Crime)
करून अटक केली आहे. हा प्रकार 8 जून 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 24 वर्षीय पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.2) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोमनाथ संभाजी कोदरे (वय 38, रा. मातोश्री बिल्डिंग, केशवनगर, मुंढवा) याच्यावर आयपीसी 376, 376 (2)(एन) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. पुण्यातील सदाशिव पेठेत ती राहते. काही दिवसांपूर्वी तिने अपना अ‍ॅपच्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज केला होता.
या माध्यमातून पीडित मुलीला हॉटेल रीजन्सी येथून फोन आला होता.
तेव्हा आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली.
आरोपीने फिर्यादी यांना आपणच हॉटेलचा मालक असल्याचे सांगून मैत्री केली.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

 

दरम्यान, आरोपीने आधीच दोन लग्न केलेली होती. ही माहिती फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवत त्याने
लग्नाचे आमिष दाखवले. आरोपीची दोन लग्न झाल्याची माहिती फिर्यादी यांना समजली.
फिर्यादी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुळुक करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A young woman studying for a competitive exam was raped by luring her into marriage; Incident in Pune

 

हे देखील वाचा :

Dhondi Champya Trailer | भरत जाधव-वैभव मांगलेची तुफान कॉमेडी असलेला ‘धोंडी चंप्या; एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित

Pune Pimpri Crime | कंपनीची फ्रॅन्चायजीच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक; दोन संचालकांवर FIR

TikTok Star Megha Thakur | टिक टॉक स्टार मेघा ठाकूरचं 21 व्या वर्षी निधन

 

Related Posts