IMPIMP

Pune Pimpri Crime | प्रेमप्रकरणातून 7 अल्पवयीन मित्रांनी केले मित्राचे अपहरण, दगडाने ठेचून केला निर्घृण खून

by nagesh
Pune Pimpri Crime | seven minor boys murdered friend in pimpri chinchwad of pune

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | प्रेमप्रकरणातून (Love Affair) 18 वर्षीय तरुणाचं मित्रांनी राहत्या घरातून अपहरण (Kidnapping) करुन त्याचा निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडली आहे. याप्रकरणात सात अल्पवयीन मुलांचा (Minor Children) सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृष्णा रेळेकर (Krishna Relekar) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत कृष्णा भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊच्या सुमारास मित्रांनी त्याला राहत्या घरातून बाहेर घेऊन गेले. त्यावेळी त्याची आई घरामध्ये होती. मुलं ओळखीची असल्याने त्यांनी काहीच चौकशी केली नाही. मात्र, बराच वेळ झाला तरी मुलगा घरी परत आला नसल्याने आईने मुलाची सर्वत्र चौकशी केली. त्यावेळी त्याला काही जणांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले. कृष्णाच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलाला मारहाण (Beating) करणाऱ्या मुलांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी एका 23 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान जुन्या भांडणाच्या रागातून आणि प्रेमप्रकरणातून कृष्णाचा खून केल्याचे उघडकीस आले. (Pune Pimpri Crime)

 

एक अल्पवयीन मुलगी कृष्णासोबत बोलत होती. त्याच मुलीवर अल्पवयीन चौघांचे प्रेम होतं असं सांगण्यात येत आहे. कृष्णा मुलीसोबत बोलत असल्याचा राग आरोपींच्या मनात होता. यातूनच त्याचे अपहरण करुन त्याला चाकण परिसरातील (Chakan Area) शेलपिंपळगाव (Shelpimpalgaon) परिसरात नेण्यात आले. त्याठिकाणी त्याचा दगडाने ठेचून खून केला. पोलिसांनी 23 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे तर 7 अल्पवयीन मुले फरार झाली आहेत. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर (DCP Manchak Ipper) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Pimpri Crime | seven minor boys murdered friend in pimpri chinchwad of pune

 

हे देखील वाचा :

Kolhapur North By Election Result 2022 | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा विजय; भाजपच्या सत्यजीत कदम यांचा मोठा पराभव

PPF Investment | ‘हा’ आहे सुरक्षित गुंतवणूकीचा मार्ग; बँक व पोस्ट ऑफिसपेक्षा मिळेल जास्त परतावा, जाणून घ्या

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

 

Related Posts