IMPIMP

Pune Pimpri Crime | सुरक्षा रक्षकाची हॉटेल व्यावसायिकाला मारहाण, ग्राहकांच्या वाहनाची केली तोडफोड

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Pimpri Crime | किरकोळ कारणावरुन सुरक्षा रक्षकाने (Security Guard) हॉटेल मालकाला दगडाने मारहाण (Beating) करत हॉटेलची तोडफोड केली. हा प्रकार (Pune Pimpri Crime) मावळमधील आंबी येथे शनिवारी (दि.10) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ऋषिकेश राजेश उल्हाळे Rishikesh Rajesh Ulhale (वय-22) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) रविवारी फिर्याद दिली आहे. या घटनेत ऋषिकेश यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी सुरक्षा रक्षक विकास भिसे Vikas Bhise (वय-32 रा. तळेगाव दाभाडे) याच्यासह 23 ते 25 वयोगटातील दोन तरुणावर आयपीसी 308, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आंबी येथे लक्ष्मी ग्रीन्स हॉटेल (Lakshmi Greens Hotel) नावाचे हॉटेल आहे.
आरोपी भिसे हा सुरक्षा रक्षक असून फिर्यादी सोबत दहा दिवसांपूर्वी भाडेतत्त्वार एकत्र घेतलेली खोली सोडल्याचा राग त्याच्या मनात होता.
याच कारणावरुन शनिवारी सायंकाळी फिर्यादी हे हॉटेलच्या दारात उभे असताना आरोपी त्याठिकाणी आले.

भिसे याने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
त्याने फिर्यादी यांच्या दिशेने दगड फेकले. यामध्ये एक दगड त्यांना लागला. तसेच हॉटेलच्या दरवाजावर दगडफेक करुन तोडफोड (Vandalism) केली. तर हॉटेलच्या दारात उभी असलेली ग्राहकाच्या गाडीची मागील काच फोडून कारचे नुकसान केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वालकोळी (PSI Walkoli) करीत आहेत.

 

हे देखील वाचा :

Rape In Pune | धक्कादायक ! बापच ठरला नराधम; आपल्याच मुलीचे केले लैंगिक शोषण

Rape In Pune | 19 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणार्‍या सावत्र मामाला अटक

Pune Crime | विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारा हरियानातील चोरटा जेरबंद

Gold Price | या आठवड्यात अचानक इतके स्वस्त झाले होते सोने, आता दरात आली तेजी

 

Related Posts