IMPIMP

Pune PMC Action On Dangerous Old Wada | पासाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका सतर्क ! शहरातील 30 धोकादायक वाडे जमीनदोस्त; 58 वाड्यांना नोटीसा

by nagesh
Pune PMC Action On Dangerous Old Wada | 30 dangerous wadas demolished By Pune PMC; Notices issued to occupants of 58 wadas

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Action On Dangerous Old Wada | पावसाळ्यात (Rain in Pune) धोकादायक वाडे कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून (PMC Construction Department) पावसाळा सुरु होण्यापूर्वी पेठांमधील वाड्यांचे सर्वेक्षण करुन ते खाली करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, अनेकदा या वाड्यांमध्ये वर्षानुवर्षे राहणारे घरमालक व भाडेकरू वाडे सोडण्यास तयार होत नाही. त्यामुळे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) अशांना भाडे प्रमाणपत्र देऊन भविष्यात नवीन बांधकामात 300 चौरस फुटांपर्यंत घर देण्याचे आश्वासन दिले आहे. परिणामी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून 10 जूनपर्यंत शहरातील 30 धोकादायक वाडे (Dangerous Mansions) जमीनदोस्त करण्यात आले आहेत. (Pune PMC Action On Dangerous Old Wada)

पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुने व धोकादायक असे 58 वाडे तसेच इमारतींना जागा खाली करण्याबाबत तसेच दुरुस्ती करण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. यापैकी 30 वाडे जमीनदोस्त केले आहेत. तर 11 वाड्यांची दुरुस्ती केली आहे. उर्वरित वाड्यांचा धोकादायक भाग काढून टाकला असून हा भाग तब्बल 19 हजार 990 चौरस फूट आहे. (Pune PMC Action On Dangerous Old Wada)

पालखीमुळे काम थांबवले

लवकरच मान्सूनच्या पावसाला (Monsoon Rains) सुरुवात होणार असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीम,
बांधकाम विभाग आणि खासगी संस्थेच्या तीन जणांच्या समितीकडून शहरातील जुन्या वाड्यांचा सर्व्हे करण्यात आला.
यामध्ये 44 वाडे धोकादायक असल्याचे समोर आले. दरम्यान, पुणे शहरात पालखी सोहळा येणार असल्याने तीन
दिवस वाड्यांवरील कार्यवाही थांबवण्यात आली आहे. पालखी सोहळा पुणे शहरातून बाहेर गेल्यानंतर ही कार्यवाही
पुन्हा सुरु केली जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अभियंता प्रवीण शेंडे (Engineer Praveen Shende) यांनी दिली.

शहरातील विभागनिहाय धोकादायक वाडे

सोमवार पेठ – 11, मंगळवार पेठ -5, बुधवार पेठ – 3, गुरुवार पेठ- 1, शुक्रवार पेठ -17, कसबा पेठ -8, रास्ता पेठ – 14

Web Title : Pune PMC Action On Dangerous Old Wada | 30 dangerous wadas demolished By Pune PMC; Notices issued to occupants of 58 wadas

Related Posts