IMPIMP

ACB Trap News | शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ ! 75 हजाराची लाच चेकने घेणार्‍या मुख्याध्यापकाला अटक; शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, हेडमास्तर अन् लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

by nagesh
ACB Trap News | Great excitement in the education sector! Headmaster arrested for taking bribe of 75 thousand by cheque; Educational institution presidents, headmasters and clerks on anti-corruption ‘radar’

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | शिक्षण क्षेत्रातून (Education Department Maharashtra) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी (Cancellation Of Transfer Order) 75 हजाराच्या लाचेची मागणी (Nashik Bribe CAse) करून ती चेकव्दारे घेणार्‍या (Bribe Amount Via Cheque) मुख्याध्यापकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau Nashik) रंगेहाथ पकडले आहे तर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह लिपीक आणि हेडमास्तरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Nashik Crime News). यामुळे संपुर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap News)

विनोद शंकर जाधव Vinod Shankar Jadhav (42, पद – मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल, (Headmaster Mahatma Phule High School Erandol) ता. एरंडोल, जि. जळगाव (Jalgoan). रा. योगेश्वर नगर, कजगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह नरेंद्र उत्तम वाघ Narendra Uttam Wagh (44, पद – कनिष्ठ लिपीक (Junior Clerk), महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल, जि. जळगाव. रा. समर्थ नगर, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव) आणि विजय पंढरीनाथ महाजन Vijay Pandharinath Mahajan (56, पद – अध्यक्ष, श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव (Shree Savata Mali Shikshan Prasarak Mandal, Jalgaon) संचालित महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव. रा. माळी वाडा, एरंडोल, जि. जळगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ,जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उप शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सदर संस्थेने तक्रारदार यांची व त्यांचे उप शिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली दि. 01/04/2023 रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल, धरणगाव येथे करण्यात आल्या बाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि. 02/05/2023 रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे कडे पाठविलेला होता.

सदर तक्रारदार यांची व त्यांचे सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात आरोपी क्रं. 1 व 2 यांनी तक्रारदार यांचेकडे व त्यांचे सहकारी उप शिक्षक यांचेकडे पंचासमक्ष स्वतःसाठी व आरोपी क्रं. 3 यांच्यासाठी दोघांचा पुर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना 75,000/-रुपये चेक स्वरूपाने लाचेची मागणी करून ती चेक स्वरूपात घेणार असल्याचे सांगितले व आरोपी क्रं. 3 यांनी आरोपी क्रं.2 यांच्या मोबाईल फोनवरून तक्रारदार यांना आरोपी क्रं. 1 व 2 यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्तता करण्यास सांगून प्राप्त करण्याचा प्रयत्न करून प्रोत्साहन दिले. व मागणी केल्याप्रमाणे 75,000/-रू.चा मुख्याध्यापक यांचे नावे असलेला चेक आरोपी क्रं. 1 यांनी महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर एरंडोल पोलीस स्टेशन (Erandol Police Station) येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. (Nashik ACB Trap)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शमिष्ठा घारगे-वालावलकर
(Nashik ACB SP Sharmistha Gharge-Walawalkar), अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी
(Addl SP Madhav Reddy), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील (DySP Shashikant Patil), पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव
(PI N.N. Jadhav), पोलिस निरीक्षक एस.के. बच्छाव (PI S.K. Bachhav), पोलिस अंमलदार सुनिल पाटील,
रविंद्र घुगे, ईश्वर धनगर, सचिन चाटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,
महिला पोलिस हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे,
पोलिस अंमलदार प्रदिप पोळ, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आणि प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली आहे. (Jalgaon ACB Trap Case)

Web Title : ACB Trap News | Great excitement in the education sector! Headmaster arrested for taking bribe of 75 thousand by cheque; Educational institution presidents, headmasters and clerks on anti-corruption ‘radar’

Related Posts