IMPIMP

Pune PMC Hospital Warje Malwadi | वारजे येथे 700 बेडस्‌चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यास शासनाचा हिरवा कंदील

महापालिका प्रथमच पीपीपी तत्वावर उभारणार आणि चालविणार हॉस्पीटल - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त व प्रशासक

by nagesh
 Pune PMC Property Tax News | Now the municipal corporation's march to the income tax arrears! Will seal the income of big arrears, charge the businessmen for change of use

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC Hospital Warje Malwadi | वारजे येथे सुमारे ७०० बेडस्‌चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारणीस राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. लवकरच याठिकाणी पीपीपी तत्वावर हॉस्पीटल उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC Hospital Warje Malwadi)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वारजे येथे पीपीपी तत्वावर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारणीचा प्रस्ताव स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने मंजुर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने देखिल मंजुरी दिली असून आज यासंबधातील आदेशही दिले आहेत. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी ३५० कोटी रुपये खर्च येणार असून पीपीपी तत्वावर हे हॉस्पीटल उभारण्यात आणि चालविण्यात येणार असल्याची माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

 

विक्रम कुमार यांनी सांगितले, की कोरोनानंतर शहरात आरोग्य उपचार सुविधांची गरज प्रकर्षाने निदर्शनास आली.
महापालिकेकडील आवश्यक मनुष्यबळाच्या मर्यादा असल्याने वारजे येथील महापालिकेच्या आरक्षित जागेमध्ये ७०० बेडस्‌चे हॉस्पीटल पीपीपी तत्वावर उभारण्याचा आणि चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पीपीपी तत्वावर कुठल्याही महापालिकेने उभारलेले हे पहिलेच हॉस्पीटल असेल.
या हॉस्पीटलच्या उभारणीसाठी नेदरलँडच्या राबो बँकेकडून एक ते दीड टक्के दराने कर्ज घेण्यात येणार आहे.
यासाठी संबधित संस्थेला महापालिका जामिनदार राहणार आहे. संबधित संस्थेने अर्ध्यातच काम सोडले तर अडचण येउ नये यासाठी इन्शुरन्स उतरविला जाणार आहे.
या रुग्णालयामध्ये महापालिकेने पाठविलेल्या रुग्णांवर सीएचएस दराने उपचार करण्यासाठी बेडस् उपलब्ध राहणार असून काही बेडस् खुल्या दराने उपचारासाठी संबधित संस्थेला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रुग्णालयाची उभारणी, डॉक्टर व कर्मचार्‍यांची नेमणूक व उपचारांची जबाबदारी ही संबधित संस्थेवर राहणार असून यासाठी उभारण्यात येणारे कर्जही संबधित संस्थाच फेडणार आहे.
हे हॉस्पीटल उभे राहील्यास शहरातील पश्‍चिम भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होईल, असा दावाही विक्रम कुमार यांनी केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे उपस्थित होते. (Pune PMC Hospital Warje Malwadi)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नायडू रुग्णालयाच्या आवारात लवकरच ‘मेडीकल कॉलेज’ च्या इमारतीच्या बांधकामाला सुरूवात

महापालिकेच्यावतीने भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
सध्या कमला नेहरू रुग्णालय आणि बाबूराव सणस कन्याशाळेच्या आवारात हे महाविद्यालय सुरू आहे.
या महाविद्यालयासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र इमारत आणि ५०० बेडस्‌चे रुग्णालय व वसतीगृह उभारण्याचे नियोजन आहे.
नायडू रुग्णालयाच्या आवारात महाविद्यालयाची शैक्षणिक इमारत, प्रयोगशाळा, लायब्ररी व तत्सम आवश्यक विभागांची निर्मिती करण्यात येणार आहे.
ही इमारत महापालिका बांधणार असून यासाठीच्या १४७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून या इमारतींच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
पुढील टप्प्यात रुग्णालय आणि वसतीगृहाची इमारत उभी करण्यात येईल.
तसेच सध्याचे नायडू सांसर्गिंक रुग्णालय बाणेर येथील पहिल्या कोरोना रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

 

 

Web Title : –  Pune PMC Hospital Warje Malwadi | Govt gives green light to set up 700 bed multi specialty hospital at Warje

 

हे देखील वाचा :

Central Home Minister Medal | पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन तपासी अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

Pune PMC News | शहरी गरिब योजनेतील लाभार्थींना लवकरच ‘डिजिटल कार्ड’ !

Chandrashekhar Bawankule | प्रदेशाध्यक्ष होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला भाजपचा ‘मास्टर प्लान’

 

Related Posts