IMPIMP

Pune PMC News – G20 Summit | G 20 परिषदेसाठीच्या ‘विद्युत रोषणाई’च्या कामांत नियमांचे उल्लंघन ! निविदा भरण्यापुर्वीच मर्जीतील ठेकेदारांकडून लाखोंच्या कामांचा सपाटा

by nagesh
Pune PMC News – G20 Summit | Violation of rules in ‘electrical lighting’ works for G 20 conference! The leveling of works worth lakhs by favored contractors even before tendering

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News – G20 Summit | जी २० परिषदेच्या निमित्ताने परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी करण्यात येत असलेल्या सुशोभिकरणाच्या कामांमध्ये (Works Of Beautification By PMC) मोठ्या प्रमाणावर अनियमीतता असल्याचे समोर येत आहे. अगोदर कोट्यवधी रुपयांच्या कुंड्या आणि त्यातील झाडे खरेदीची निविदेबाबत शंका निर्माण झाली असतानाच आता विद्युत विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्युत विभागाने मेट्रो पिलर (Pune Metro), रस्ते व काही चौकांमध्ये रंगीबिरंगी प्रकाश झोत सोडण्याची निविदा (PMC Tender) उघडण्याअगोदरच ठेकेदारांकडून (Contractors In Pune) कामे करून घेतली आहेत. विशेष असे की या कामाच्या निविदा देखिल उद्यान विभागाप्रमाणे तुकड्या तुकड्यांत काढण्यात आल्याने जी २० च्या नावाखाली अधिकारी ‘सोकावल्या’चे पाहायला मिळत आहे. (Pune PMC News – G20 Summit)

विद्युत विभागाने शनिवारी ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत मेट्रो पिलरवर रंगीत प्रकाश झोत सोडण्यासाठीची निविदा काढली आहे. सुमारे ४९ लाख रुपयांची ही निविदा आहे. सात दिवसांच्या अल्प कालावधीसाठी ही निविदा काढली असताना प्रत्यक्षात काल रात्री (रविवारी) हे काम पूर्ण देखिल झाले आहे. (Pune PMC News – G20 Summit)

यासोबतच शहरातील विविध उड्डाणपुल, नळ स्टॉप चौकातील उड्डाणपुल, विश्रांतवाडी येथील रस्ता, अलका टॉकीज ते दांडेकर पुला दरम्यान रंगबेरंगी रोषणाई करण्यासाठीच्या देखिल निविदा काढण्यात आल्या आहेत. यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या निविदा उघडण्यापुर्वीच येथील रोषणाईची कामे करण्यात आली आहेत. या कामासाठी अद्याप निविदा आल्या नसतानाच विद्युत विभागाने त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराकडून हे काम करून घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे निविदा या केवळ फार्सच असून जी २० नावाखाली सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत.

या अगोदर उद्यान विभागाने नगर रस्ता परिसरातील सात उड्डाणपुलांवर मोठ्या कुंड्या आणि त्यातील विदेशी प्रजातीची शोभिवंत झाडे खरेदीच्या दोन स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. या दोन निविदा एकत्रित ९८ लाख रुपयांच्या आहेत. केवळ एस्टीमेट कमिटीच्या मान्यतेसाठी जावे लागू नये यासाठी तुकड्यांमध्ये या निविदा काढण्यात आल्या आहेत. ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी दरांबाबत बाजारातून माहिती घेण्यात येईल, त्यानंतरच खरेदीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. परंतू यानंतरही विद्युत विभागाने निविदा प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्ये निविदा भरण्यापुर्वीच मर्जीतील ठेकेदाराकडून रोषणाईचे कामही करून घेतल्याने विद्युत विभागाच्या कार्यपद्धतीवर ‘प्रकाश’ पडला आहे.

यासंदर्भात विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल (Shrinivas Kandul) यांच्याशी संपर्क साधला असता,
ते म्हणाले जी २० साठी अनेक कामांच्या निविदा राबविण्यात आल्या आहेत.
परंतू ‘वरिष्ठांच्या’ सूचनेनुसार ऐनवेळी रोषणाईच्या कामामध्ये बदल करावा लागला आहे.
आजपासून (दि.१२ जून) जी २० परिषद सुरू होत असल्याने युद्धपातळीवर ही कामे करून घेण्यासाठी
एस्टीमेट रेटपेक्षा कमी दराने ठेकेदाराला ही कामे दिली आहेत. वेळेत कामे पुर्ण व्हावीत, यासाठी निविदांचे तुकडे केले.

Web Title : Pune PMC News – G20 Summit | Violation of rules in ‘electrical lighting’ works for
G 20 conference! The leveling of works worth lakhs by favored contractors even before tendering

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – फिर्याद दाखल होण्यापूर्वीच
पोलिसांनी पकडले चोरट्यांना

Related Posts