IMPIMP

Pune PMC News | जप्त केलेल्या बेवारस 506 वाहनांचा महापालिका करणार लिलाव

by sachinsitapure
Pune PMC

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने (PMC Encroachment Department) गेल्यावर्षभरात रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने जप्त केली असुन, त्यापैकी ५०६ विविध प्रकारच्या वाहनांचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रक्रीया सुरु केली आहे. (Pune PMC News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पंधरा वर्षाचा कालावधी उलटून गेलेली, ना दुरुस्त असलेली वाहने नागरीकांकडून घराबाहेर किंवा शहरातील विविध रस्त्यांवर उभी केली जातात. वाहने शहरातील लहान मोठ्या रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे धूळ खात उभी आहेत. त्यामुळे या वाहनांचा वाहतुकीला आणि पादचार्यांना अडथळा होत आहे. तसेच या ठिकाणी साफ सफाई करता येत नसल्याने या भागात दुर्गंधी पसरते, या स्वरुपाच्या तक्रारी येतात. अशी वाहने महापालिकेकडून जप्त केली जातात. या वाहनांवर सर्वात प्रथम नोटीस चिकटविली जाते. या नोटीस नुसार सदर वाहन सात दिवसांच्या आत हलविण्याची मुदत दिली जाते, त्यानंतर हे वाहन जप्त केले जाते. त्यानंतर वाहन मालकाकडून दंड वसुल करून ते वाहन परत केले जाते. साधारणपणे त्यासाठी पाच ते दहा हजार रुपये इतका दंड आकारला जातो. (Pune PMC News)

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या वर्षभरात ५३५ वाहने जप्त केली आहे. यामध्ये ३४५ दुचाकी, ९२ तीन चाकी,
९१ चार चाकी आणि सहा चाकी तीन वाहने जप्त केली आहे. यापैकी पाच दुचाकी, सात तीन चाकी, सोळा चार चाकी आणि
एक सहा चाकी वाहन मुळ मालकांनी परत नेली आहेत. सध्या महापालिकेकडे ५०६ वहने शिल्लक असुन, त्या
वाहनांचा लिलाव लवकरच केला जाणार आहे, अशी माहीती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप
(Madhav Jagtap PMC) यांनी दिली.

सव्वा कोटीहून अधिक रुपये जमा

महापालिकेकडून यापुर्वी जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाची प्रक्रीया दोन वेळा राबविली आहे. २०१८ मध्ये १६ लाख
रुपये लिलावातून मिळाले होते. त्यानंतर ११४६ वाहनांचा २०२२ मध्ये लिलाव केला गेला.
यातून महापालिकेला १ कोटी २३ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले होते.

Related Posts