IMPIMP

Pune PMC News | पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज ! वारकर्‍यांच्या आरोग्याला महापालिकेचे प्राधान्य; महिला वारकर्‍यांना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप करणार

by nagesh
Pune PMC - Uruli Devachi - Fursungi | The demand to create an independent municipality or municipality excluding villages is 'political'! Pune PMC News Uruli Devachi - Fursungi Hadapsar & Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune PMC News | संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी (Palkhi 2022) महापालिकेने (Pune Municipal Corporation) जय्यत तयारी केली आहे. पालखी मार्गावर कायम स्वच्छतेसोबतच, पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच महापालिकेने यंदा प्रथमच आरोग्य वारी ही संकल्पना राबवून महिला वारकर्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याची तयारी केली आहे. (Pune PMC News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २२ जून रोजी पुण्यात येत असून दोन दिवसांच्या मुक्कामानंतर २४ जूनला पंढरपूरकडे रवाना होणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. यामुळे यंदाच्यावर्षी या सोहळ्यात १४ ते १५ लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर २२ ते २४ जून दरम्यान शहरातील व पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यासोबतच पालखी मार्गावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने व्यापक तयारी केली आहे. (Pune PMC News)

 

स्वच्छतेवर भर
पालखी मार्गावर पालखी आगमनापुर्वी व पालखी पुढे गेल्यानंतर झीरो गार्बेज संकल्पनेअंतर्गत रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. पालखी दरम्यान ‘प्लास्टिक’चा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटस्ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सार्वजनिक हौद आणि मोकळ्या जागांची सफाई करण्यात आली असून त्याठिकाणी जंतुनाशक पावडरचा वापर करण्यात येत आहे.

पाणी पुरवठा
पालखी सोहळ्यादरम्यान पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शहरात पालखीच्या मुक्कामांच्या ठिकाणी तसेच वारीमध्येही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच २८ ठिकाणी तात्पुरते नळजोडही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही, असे नियोजन करण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.

 

वारकरी महिलांना सॅनेटरी नॅपकिन्स
महापालिकेच्यावतीने महिला वारकर्‍यांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या १० शाळांमध्ये मुक्कामांच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटत केले जाणार असून पालखी तळ परिसरात सॅनेटरी नॅपकिन व्हेंडींग मशीन्स बसविण्यात येणार आहेत. महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर स्त्री रोग तज्ञही नेमण्यात येणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरोग्य सुविधा
महापालिकेच्यावतीने विविध २१ ठिकाणी औषधांचे वाटप करण्याची सुविधा उभारण्यात येणार आहे. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी नाना पेठेतील रफी महमंद किडवाई शाळा आणि मामासाहेब बडदे दवाखान्यात वारकर्‍यांसाठी कोरोना लसीकरणाची मोफत सुविधा करण्यात आली आहे. यासोबतच महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सुविधा सुरू राहाणार आहे.

 

पालखी तळावर विशेष सुविधा
नाना पेठेतील पालखी विठोबा आणि निवडुंग्या विठ्ठल मंदिर या ठिकाणी पालख्यांचा मुक्काम राहाणार आहे.
याठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा तसेच मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या परिसरात वारकर्‍यांसाठी पाण्याचे टँकरही असतील.
तसेच सॅनेटरी नॅपकिन वाटपासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे, असे महापालिकेने कळविले आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation ready to welcome palanquins! Municipal Corporation’s priority on health of Warkaris; Free distribution of sanitary napkins to women workers

 

हे देखील वाचा :

Vidhan Parishad Election 2022 | हितेंद्र ठाकूर यांची संजय राऊतांना चपराक; म्हणाले – ‘तुमच्यात हिंमत असेल तर…आमदार काय मच्छिबाजार वाटला का ?’

Premium Financing | इन्श्युरन्स प्रीमियम आता ओझे नाही, भरण्यासाठी मिळेल कर्ज, जाणून घ्या नवीन नियम

Demat Account | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी ! डिमॅट खात्याबाबत SEBI ची मोठी घोषणा

 

Related Posts