IMPIMP

Demat Account | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी ! डिमॅट खात्याबाबत SEBI ची मोठी घोषणा

by nagesh
SEBI | sebi bars bombay dyeing ness wadia others from securities market for up to 2 yrs imposes rs 15-75 cr fines

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूकदारांसाठी (Investors) महत्त्वाची बातमी आहे. सेबीने (SEBI) गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार लिंक (Aadhaar Link) करण्यापासून ट्रेडिंग (Trading Account)-डिमॅट खात्यापर्यंत (Demat Account) नॉमिनीचे (Nominee) नाव नोंदविणे अनिवार्य आहे. सेबीने 31 मार्च 2022 रोजी नॉमिनेशनची अंतिम मुदतही घोषित केली होती. मात्र, आता सेबीने ती एक वर्षासाठी वाढवली आहे. म्हणजे आता गुंतवणूकदार हे (Demat Account) काम 31 मार्च 2023 पर्यंत करु शकतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, सेबीच्या नियमांनुसार, ज्यांच्याकडे डिमॅट (Demat Account) किंवा ट्रेडिंग खाते आहे, त्यांच्यासाठी सेबीने 31 मार्च पर्यंत नॉमिनीच्या नावाची नोंदणी करण्याचा नियम केला आहे. आतापर्यंत ज्यांनी डिमॅट किंवा ट्रेडिंग खात्यात नॉमिनेशन केले नाही, ते आता 31 मार्च 2023 पर्यंत करु शकतात. यापूर्वी ही अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती. आता एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

सेबीकडून परिपत्रक जारी

सेबीने यासाठी परिपत्रक जारी (Circular Issued) केले आहे. यामध्ये सेबीने म्हटले आहे की, नॉमिनी करण्यासाठी साक्षीदाराची गरज नाही. नॉमिनीच्या फॉर्मवर खातेदाराने स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. याशिवाय, ई-साइन सुविधेचा (E-sign Facility) वापर करुन ऑनलाइन भरलेल्या नामांकन/घोषणा फॉर्मसाठी साक्षीदाराची आवश्यकता नाही. मात्र, जर खातेदाराने स्वाक्षरी ऐवजी अंगठ्याचा ठसा वापरल्यास, फॉर्मवर साक्षीदाराची स्वाक्षरी देखील असणे आवश्यक आहे.

 

कसे कराये नॉमिनेशन ?

जर तुम्हाला तुमच्या खात्यात नॉमिनी व्यक्तीचे नाव देखील जोडायचे असेल तर सर्वात आधी तुम्ही नामांकन फॉर्म भरुन त्यावर स्वाक्षरी करुन मुख्य कार्यालयाच्या (ज्या ब्रोकर कंपनीने डिमॅट खाते उघडले आहे. उदा. zerodha) पत्त्यावर कुरिअर करू शकता.

तुमच्या टेड्रिंग आणि डिमॅट खात्यावर नॉमिनेशन लागू होईल, हा नॉमिनी तुमच्या डिमॅट खात्यात जोडला जाईल.
हेच नॉमिनेशन तुमच्या कॉइन (म्युच्युअल फंड – Mutual Fund) होल्डिंगसाठीही लागू होईल.

तुम्हाला नॉमिनेशन फॉर्म सोबत नॉमिनीचा आयडी प्रूफ पाठवावा लागेल.

यासाठी तुम्ही आधार, मतदार ओळखपत्र (Voter ID Card), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) इत्यादी कोणताही आयडी पुरावा पाठवू शकता.

तुमचे खाते उघडल्यानंतर आणि एखाद्याला नॉमिनी बनवल्यानंतर तुम्हाला नॉमिनी बदलायचा असेल,
तर तुम्हाला 25+18 टक्के जीएसटी (GST) शुल्क भरावे लागेल.

यासाठी, तुम्हाला अकाउंट मॉडिफिकेशन फॉर्मसह नॉमिनेशन फॉर्मची हार्ड कॉपी पाठवावी लागेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :-  Demat Account | share market invester sebi has did big announcement related nomination of demat account know in detail

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | … म्हणून धनंजय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Aadhaar सोबत Voter ID लिंक करण्याची सुरुवात 1 ऑगस्टपासून, लिंक करायचे नसेल तर काय आहे पर्याय ?

Business Idea | नोकरीचे टेन्शन संपले, सुरू करा सध्याच्या काळातील हॉट बिझनेस; रोज होईल बंपर कमाई

 

Related Posts