IMPIMP

Pune PMC News | पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ‘ईएसआईसी’चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Corporation will take the initiative and endeavor to provide the benefits of 'ESIC' to all contract workers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | पुणे मनपा मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य महामंडळाचे (ई एस आय सी) फायदे कसे घ्यावेत या संदर्भामध्ये मनपा व कामगार राज्य विमा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये ई एस आय सी चे पुणे रिजनचे उपनिदेशक हेमंत पांडे, डेप्युटी संचालक चंद्रकांत पाटील तर मनपाचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, कामगार अधिकारी केंजळे, खिलारी हे उपस्थित होते. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कार्यशाळा कामगार नेते व इ एस आय सी चे स्थानीय सल्लागार समितीचे सदस्य सुनील शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेमध्ये हेमंत पांडे यांनी ईएसआयसीच्या वेगवेगळ्या कायद्याबाबत माहिती दिली.
चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळे लाभ कसे घ्यावेत या संदर्भातले सविस्तर प्रेझेंटेशन दिले.
शिवाजी दौंडकर यांनी पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल असे सांगितले.
सुनील शिंदे यांनी एस आय सी चे लाभ घेण्यासाठी त्याची नोंदणी सर्व कामगारांनी तात्काळ करून घ्यावी व त्याचे लाभ व नोंदणी करण्यासाठी संघटनेच्या कार्यालयामध्ये मोफत संगणक व मार्गदर्शक नेमण्यात येणार असून त्याद्वारे सर्व कंत्राटी कामगारांनी एस आय सी चा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
त्याचबरोबर ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मनपाचे आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar)
व अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Dr. Kunal Khemnar IAS) यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले. (Pune PMC News)

 

केंजळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे करण्यात आले होते.
यासाठी मोठ्या संख्येने पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार हे उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation will take the initiative and endeavor to provide the benefits of ‘ESIC’ to all contract workers

 

हे देखील वाचा :

Nilesh Rane | रत्नागिरी हातिवले टोल नाक्यावर निलेश राणे आक्रमक

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक

Aurangabad Crime | धक्कादायक ! दिराचा जडला वहिनीवर जीव, पैशांची मागणी करताच केला गेम; औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

 

Related Posts