IMPIMP

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक

by nagesh
IPS Rashmi Shukla | ajit pawar slams cm eknath shinde phone tapping case maharashtra assembly winter session

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनात महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या फोन टॅपिंगच्या प्रकरणावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच भडकले. या प्रकरणात राज्य सरकारला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. (IPS Rashmi Shukla)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिवाळी अधिवेशने वादळी होतात आणि त्यानंतर अनेकवेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिल्याचा इतिहास आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन देखील वादळीच सुरू आहे. मागील तीन दिवसांत अधिवेशनात कर्नाटक सीमाप्रश्न, नागपूर एनआयटी भूखंड आणि मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्यांवरील राज्य शासनाचा खर्च आदी मुद्दे आले. गुरूवारी अधिवेशनात रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले. रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचा तपास बंद करण्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पुन्हा एकदा रश्मी शुक्ला चर्चेत आल्या आहेत. या मुद्यावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली.

 

मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याप्रकरणी अध्यक्ष नार्वेकर राज्य सरकारला पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. अजित पवारांनी सभागृहात फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करताना सदस्याच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे आवाहन सभागृहाध्यक्षांना केले.

 

पवार म्हणाले, या सरकारच्या मागच्या काळात एक लक्षात आले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख, खासदार संजय राऊत, आमदार एकनाथ खडसे अशा अनेक राजकीय नेत्यांचे कोणतेही प्रबळ कारण नसताना फोन टॅप करण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात एक जबाबदार ज्येष्ठ महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला संबंधित आहेत. कोणाच्या आदेशाने त्यांनी फोन टॅप केले? याचा खटला चालू होता. सूत्रधाराचा पर्दाफाश होईल, अशी भीती विद्यमान सरकारच्या मनात आहे का? या प्रकरणात भारतीय टेलिग्राफ कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. विधिमंडळ सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला गेला, तर हे लोकशाहीला घातक नाही का? अशा अधिकाऱ्याला का पाठिशी का घातले जात आहे? शेवटी तो तपास थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. तो का केला गेला? उच्च न्यायालयाने मध्यस्थी करून सांगितले, की अशा प्रकारे प्रकरण मागे घेता येणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अध्यक्ष महोदय हे काय चाललंय काय? तसेच पवार पुढे म्हणाले,
अलिकडच्या काळात सातत्याने या घटना घडत आहेत. आपल्या सर्वांचे काम आहे की सदस्यांना प्रत्येक
बाबतीत संरक्षण दिले गेले पाहिजे. आमचा असा अवमान होत असेल, तर यासंदर्भात कसे चालणार?
आम्ही सरकारमध्ये असताना फोन टॅपिंगचे आदेश काढले होते का?

 

Web Title :- IPS Rashmi Shukla | ajit pawar slams cm eknath shinde phone tapping case maharashtra assembly winter session

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | धक्कादायक ! दिराचा जडला वहिनीवर जीव, पैशांची मागणी करताच केला गेम; औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, जयंत पाटील यांचं निलंबन

PM Kisan | १२ कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, या दिवशी येऊ शकतो पीएम किसानचा १३वा हप्ता!

 

Related Posts