IMPIMP

Pune PMC News | वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ‘ठेकेदार’ डोळ्यासमोर ठेवून महापालिकेला कर्जबाजारी करण्याचा प्रकल्प; शिंदे-फडवणीस सरकारने दिली कर्ज काढण्यास मान्यता

सल्लागार नेमण्याच्या उलट्या क्रमामुळे ‘संशयात’ भर ! ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्याची सूचना भाजप नगरसेवकांची

by nagesh
Pune PMC News | The 'Crystal' company associated with the ruling MLA has still not paid the salary of the municipal security guards

सल्लागार नेमण्याच्या उलट्या क्रमामुळे ‘संशयात’ भर ! ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्याची सूचना भाजप नगरसेवकांची

 

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | ठेकेदारासाठी कर्ज काढून वारजे येथे ३५० बेडस्चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल (Warje
Multispeciality Hospital) उभारणीच्या संशयास्पद प्रस्तावातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या कामासाठी सल्लागार
नेमण्याची कुठलिही प्रक्रिया न करता थेट शासनाच्या पॅनेलवरील सल्लागार संस्थेची नियुक्ती करून हॉस्पीटल उभारणीच्या प्रस्तावापासून निविदा
प्रक्रियेपर्यंतची सर्व कार्यवाही करण्यात आली आहे. हॉस्पीटल उभारणीच्या निविदा उघडण्यात आल्या असून आता त्या सल्लागार संस्थेची ‘कायदेशीर’
नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष असे की, ठेकेदारासाठी कर्ज काढण्याची उपसूचना भाजपच्या पाच नगरसेवकांनी दिली असून
राज्यात सत्तांतरानंतर आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Govt) कर्ज काढण्यास मान्यता दिल्याचे समोर आले आहे. (Pune
PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

डिजाईन-बील्ट – फायनान्स – फायनान्स – ऑपरेट – ट्रान्सफर (डीबीएफओटी) या तत्वावर उभारण्यात येणार्‍या हॉस्पीटलच्या निविदा प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर काल अखेरच्या दिवशी दोन निविदा आल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर येथील मेसर्स ए.सी.शेख कॉन्ट्रॅक्टर आणि आणि पुण्यातील दोनच वर्षांपुर्वी भागीदारीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या रुरल एनहान्सर्स एलएलपी या दोनच वषार्र्ंपुर्वी स्थापन झालेल्या भागीदारी कंपनीचा समावेश आहे. यापैकी मे. ए.सी.शेख कॉन्ट्रॅक्टर ही कंपनी रस्ते, उड्डाणपूल आदींची कामे करते. तर रूरल एनहान्सर्स एलएलपी या कंपनी विविध क्षेत्रात काम करते. दोन्ही निविदांची तांत्रीक तपासणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, डीबीएओटी पद्धतीने हॉस्पीटल उभारणीची निविदा मागविण्यापुर्वी महापालिकेने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले होते. यामध्ये दिल्लीतील प्रसिद्ध अपोलो हॉस्पीटल, अशोका ग्रुप, इ ऍन्ड एन ग्रुप, आय.एच.जी. ही आंतरराष्ट्रीय कंपनी आणि हैद्राबाद येथील किंग्ज ग्रुप या आरोग्य क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी प्रि बीड मिटींगला हजेरी लावली होती. मात्र, प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेत या कंपन्या सहभागी झालेल्या नाहीत, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली. (Pune PMC News)

दरम्यान, हॉस्पीटल उभारणीसाठी ठेकेदाराला महापालिकेने कर्ज काढून द्यायचे. त्याची परतफेड करण्याची संपुर्ण जबाबदारी ही ठेकेदारावर राहील, अशी उपसूचना भाजपचे नगरसेवक राहुल भंडारे, अर्चना पाटील, उज्वला जंगले, मनिषा कदम, मानसी देशपांडे आणि सुनिता गलांडे यांनी ९ फेब्रुवारी २०२२ रोजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये दिली आहे. विशेष असे की हा प्रस्ताव विनाचर्चाच मंजुर झाला होता. तर १८ फेब्रुवारी रोजी लगेचच सर्वसाधारण सभेपुढे हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. नगरसेवकांचा कार्यकाल १४ मार्चला संपुष्टात आला. त्यापुर्वी झालेली १८ फेब्रुवारीची सर्वसाधारण सभा ही या टर्ममधील शेवटची सभा होती. या सभेमध्ये तब्बल १६९ प्रस्ताव एकाच वेळी पुकारून त्यांना मंजुरी घेण्यात आली. त्यामध्येच हॉस्पीटल उभारणीचा हा प्रस्ताव होता. हे सर्व प्रस्ताव अवघ्या मिनिटभरात कुठल्याही चर्चेशिवाय मंजुर करण्यात आले आहेत, हे अनुक्रमे स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मिनिटस्वरून समोर आले आहे.

 

सल्लागार नेमताना प्रक्रियेला बगल…. आता धावाधाव
वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यासाठी पीडब्ल्यूसी या हरियानातील सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. जूनमध्ये या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. परंतू साधारण १० -२० कोटी रुपयांच्या कामासाठी सल्लागार नेमताना महापालिका एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट प्रसिद्ध करते किंवा निविदा काढते. त्यातूनही शासनाच्या सल्लागार पॅनेलवर असलेल्या संस्थेला प्राधान्य देते. परंतू पीडब्ल्यूसी या कंपनीची नियुक्ती करताना या कार्यपद्धतीचा अवलंब केलेला नाही. या कंपनीला आरोग्य विभागाने थेट वर्क ऑर्डर दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यानंतर या कंपनीने तयार केलेला आराखडा आणि अटी शर्तींनुसारच निविदा प्रक्रिया राबविली आहे. साधारणपणे सल्लागार कंपनीने आराखडा दिल्यानंतर त्यावर प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या एस्टीमेट कमिटीपुढे तो आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात येतो. एस्टीमेट कमिटी त्यातील प्रत्येक घटकावर चर्चा करून अंतिम निर्णय घेते. त्यानंतरच निविदा प्रक्रियेसाठी अंतिम आराखडा हा अटी शर्तींसह तयार होतो. परंतू या कार्यपद्धतीला देखिल फाटा देउन एस्टीमेट कमिटीच्या मान्यतेशिवायच ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यानंतर आतामात्र पीडब्ल्यूसी या कंपनीला सल्लागार नेमण्यासाठी कायदेशीर कार्यवाही सुरू केल्याने हॉस्पीटल उभारणीच्या या आडवाटेने आलेल्या प्रस्तावाबाबत संशय अधिकच बळावला आहे.

 

वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचा प्रस्ताव
शहरातील पश्‍चिम भागामध्ये नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा रास्त दरामध्ये मिळाव्यात यासाठी वारजे येथील स.नं.७९/ब येथील आरक्षित अडीच एकर जागेवर डीबीएफओटी तत्वावर ३५० बेडस्चे हॉस्पीटल उभारायचे. हे हॉस्पीटल उभारणारी संस्थाच ते हॉस्पीटल ३० वर्षे चालविणार. या बदल्यात महापालिकेने रिफर केलेल्या शहरातील रुग्णांसाठी येथील १० टक्के अर्थात ३५ बेडस् राखीव राहातील. त्यांच्यावर सीजीएचएस दराने उपचार केले जाणार.

 

प्रस्तावावर झालेली कार्यवाही पुढीलप्रमाणे:
– स्थायी समितीच्या २०२०-२१ च्या अंदाजपत्रकामध्ये वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारणीची घोषणा.

– जून २०२१ मध्ये पीडब्ल्यूसी या सल्लागार कंपनीला वर्कऑर्डर.

– महापालिका आयुक्त यांनी ८ फेब्रुवारी २०२२ रोजी डीबीएफओटी तत्वावर हास्पीटल उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला.

– ९ फेब्रुवारी २०२२ ला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शासनाच्या परवानगीने ठेकेदाराला कर्ज पुरवठा करण्याच्या उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर.

– १८ फेब्रुवारी २०२२ ला सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी.

– १४ मार्चपासून महापालिकेमध्ये प्रशासक राजवट.

– ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी.

– ८ ऑगस्ट २०२२ रोजी राज्य शासनाची महापालिकेने ठेकेदारासाठी कर्ज काढण्यासाठी सशर्त परवानगी.

– नोव्हेंबर २०२२ निविदा प्रसिद्ध. दोन वेळा मुदतवाढ. २९ डिसेंबर रोजी निविदा उघडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याबाबत पीडब्ल्यूसी या सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही सल्लागार कंपनी शासनाच्या पॅनेलवरील आहे. त्यामुळे थेट वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.

 

– रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त.
(Ravindra Binawade, PMC Additional Commissioner)

 

Web Title :- Pune PMC News | Warje Multispeciality Hospital project to market debt to
the Municipal Corporation keeping in mind the ‘contractor’; Shinde-Fadwanis government has given approval to draw loans

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | माझ्या विरोधात रचलेल्या कटात आपल्याच पक्षातील नेता; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप, शिंदे गटातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर?

Janhvi Kapoor | जान्हवी कपूर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला करतेय डेट? तो व्हिडिओ व्हायरल

Sidharth Malhotra – Kiara Advani | अखेर सिद्धार्थ आणि कियारा ‘या’ तारखेला अडकणार लग्न बंधनात; राजस्थानमधील ‘या’ ठिकाणी घेणार सात फेरे

Related Posts