IMPIMP

Pune Police | पुणे शहरामध्ये गुन्हे शाखेच्या भरोसा सेलच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी ‘बडी कॉप’ पुन्हा सुरू

by nagesh
Pune Police | Buddy Cop re-launched in Pune for the safety of women Pune Police Crime Branch Bharosa Cell

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Police | कमाच्या ठिकाणी तसेच कामावरुन घरी जाताना किंवा घरुन कामावर जाताना रस्त्यात महिला, युवतींचा शारीरिक छळ तसेच अश्लील शेरेबाजी रोखण्यासाठी पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) भरोसा सेलच्या (Bharosa Cell Pune) वतीने बडी कॉप योजना (Buddy Cop Scheme) सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये आवश्यकतेप्रमाणे 5 ते 15 कर्मचाऱ्यांची बडी कॉप म्हणून निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या महिलांना तातडीने मदत मिळणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यभरात शासकीय तसेच खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला व युवतींचा लैंगिक छळ (Sexual Harassment) झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या ठिकाणांसोबतच त्या महिला घरी जाताना किंवा घरुन कामावर येताना रस्त्यामध्ये त्यांचा छळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) यांनी बडी कॉप ही योजना कार्यान्वित करुन अशा महिलांना सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले होते. यावरुन पुणे पोलिसांनी (Pune Police) बडी कॉप योजना सुरु केली आहे.

 

 

बडी कॉपमध्ये निवड करण्यात आलेले पोलीस अंमलदार हे वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरदार महिलांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करतील. एका ग्रुपमध्ये एक बडी कॉप, चौकी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) व 100 ते 150 नोकदार महिला राहतील. ग्रुपमधील संबंधित महिला या अडचणीच्या वेळी बडी कॉप यांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा फोनद्वारे संपर्क साधतील. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात ही योजना बंद होती. मात्र आता पुन्हा ही योजना सुरु करण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही योजना पोलीस महासंचालक यांची असून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बल सुरक्षा पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम (
Police Inspector Rajendra Kadam) व सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके (API Archana Katke) व स्टाफ पाहणार आहेत.

 

 

Web Title : Pune Police | Buddy Cop re-launched in Pune for the safety of women Pune Police Crime Branch Bharosa Cell

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सराईत तडीपार गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

Pune Crime | पुण्यातील मोक्क्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार सनी हिवाळेचा कारागृहातून बाहेर येताच लाकडी दांडके, दगडाने ठेचून खून, प्रचंड खळबळ

Maharashtra Schools | राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी

 

Related Posts