IMPIMP

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात कोम्बिंग ऑपरेशन, 2924 सराईतांची केली तपासणी

614 गुन्हेगार मिळून आले ! 11 जणांना अटक तर 15 कोयते अन् 2 तलवारी जप्त

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे पोलीस आयुक्तालय (Pune Police Commissionerate) कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन (Police station) व गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) वतीने कोम्बिंग ऑपरेशन मोहीम (Pune Police Combing Operation) राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन सोमवारी (दि.28 फेब्रुवारी) रात्री 11 ते मंगळवारी (दि.1 मार्च) मध्यरात्री एक या कालावधीत राबवण्यात आले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Bus Stand), रेल्वे स्टेशन (Railway Station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 2924 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 614 गुन्हेगार मिळून आले आहेत.

 

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 5 हजार 200 रुपयांचे 15 कोयते, दोन हजार रुपयांच्या 2 तलवारी (Sword) जप्त करुन 11 आरोपींना अटक (Arrest) केली आहे. गुन्हे शाखेने 6 आणि पोलीस स्टेशनने 4 असे एकूण 10 केसेस दाखल केले आहेत.

 

अंमली पदार्थ विरोधी पथक -2 (Anti Narcotic Cell) च्या पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत 82 हजार रुपये किमतीचा 4 किलो 78 ग्रॅम गांजा (Marijuana) जप्त करुन एका आरोपीला अटक केली.
त्याच्यावर एनडीपीएस अ‍ॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
मुंबई प्रोहिबिशन अ‍ॅक्ट (Mumbai Prohibition Act) नुसार पोलिस स्टेशनने 4 गुन्हे दाखल करुन
तीन आरोपींना अटक करुन 1200 रुपयांची 30 लिटर गावठी दारु जप्त केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोम्बींग ऑपरेशनमध्ये सीआरपीसी कायद्यानुसार (CRPC Act) 41 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
तसचे तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आले. तसेच 130 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली.
नाकाबंदी कारवाईमध्ये 554 संशयित वाहन चालकांना चेक करुन 14 जणांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक शाखेने 19 दुचाकी, 15 तीन चाकी, 15 चारचाकी अशा एकूण 49 जणांवर कारवाई केली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Naranvare), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad), पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
पोलीस उपायुक्त वाहतुक विभाग राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Pune Police Combing Operation | Combing operation of Pune police in the city

 

हे देखील वाचा :

Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Corporator Pramod Bhangire | महंमदवाडी येथील जय भवानी चौकाचे सुशोभीकरण, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण

Physical Exhaustion Foods | सावधान ! ऊर्जा देण्याऐवजी थकवा वाढवू शकतात हे खाद्य पदार्थ, कदाचित तुम्ही तर करत नाहीत ना सेवन?

Kirit Somaiya | मुंबई CP ची हाकालपट्टी का केली ? उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकत नाहीत – किरीट सोमय्या

 

Related Posts