IMPIMP

Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

by nagesh
MNS On NCP -Shivsena | shiv sena is sharad pawars caged cat in the zoo mns leader sandeep deshoande snarky criticism

सरकारसत्ता ऑनलाइन – Ashish Shelar | राज्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वातावरण तापलेलं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केल्यापासून विरोधी पक्ष भाजपने (BJP) त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा घेणार नसल्याची स्पष्टपणे सांगितलं आहे. दुसरीकडे भाजपने आपली मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

उद्धवजी, शरद पवारांसमोर (Sharad Pawar) झुकू नका, नवाब मलिक यांची हकालपट्टी करा. या तीन पक्षांमध्ये आमच्या अपेक्षा या फक्त तुमच्याकडून आहेत. बाकी दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकर भूमिका घेतील अशी अपेक्षा असल्याचं आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी ते बोलत होते.

 

 

उद्धव ठाकरे यांनी आता काही करून दाखवायची वेळ आहे.
दाऊद आणि हस्तकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांना (Central Investigation Agency) तपास कार्यात सहकार्य करा, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली आहे.
त्यासोबतच, संभाजीराजेंकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही.
पण नवाब मलिकांच्या रुदालीत सामील व्हायला सगळं मंत्रिमंडळ लगेच दाखल होतं. म्हणजे आता आडनावावरून न्यायिक भूमिका ठरणार का ?, असा सवालही शेलारांनी उपस्थित केला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, आशिष शेलार यांनी दिलेल्या सल्ल्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Ashish Shelar | ashish shelar targets cm uddhav thackeray on ncp minister nawab malik ed case issue sharad pawar

 

हे देखील वाचा :

Corporator Pramod Bhangire | महंमदवाडी येथील जय भवानी चौकाचे सुशोभीकरण, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण

Physical Exhaustion Foods | सावधान ! ऊर्जा देण्याऐवजी थकवा वाढवू शकतात हे खाद्य पदार्थ, कदाचित तुम्ही तर करत नाहीत ना सेवन?

Kirit Somaiya | मुंबई CP ची हाकालपट्टी का केली ? उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकत नाहीत – किरीट सोमय्या

 

Related Posts