IMPIMP

Kirit Somaiya | मुंबई CP ची हाकालपट्टी का केली ? उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकत नाहीत – किरीट सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiyas serious allegations against uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) मंत्र्यांवर हल्लाबोल करणारे भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत त्यांना आव्हान दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी सोमय्या कुटुंबीयांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपावर बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त (Police Commissioner) झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकणार नाहीत, असे वक्तव्य केले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘बाप बेटे जेल जाएंगे’ असे म्हणत संजय राऊतांनी किरीट आणि नील सोमय्या यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरु केली आहे. यानंतर नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) याचिका दाखल केली. त्यावर आज निकाल येणार आहे. याच मुद्यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला.

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, राज्यातील जनतेला काल कळलं की, नील सोमय्या निर्दोष आहे.
त्यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोषी ठरवले नाही, त्यामुळे त्यांची बदली केली. संजय राऊत तुम्ही नौटंकीबाज आहात हे कबूल करा.
कसला गेम बिन. ईडीने (ED) बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे आहे ? असा सवाल त्यांनी केला.
पेड मीडिया एजन्सी (Paid Media Agency) सल्ला देत आहे.
मोदी सरकार (Modi Government) मागे लागलंय असं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मग पोलीस कमिश्नरची हकालपट्टी का केली ते सांगा, असेही सोमय्या म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी किरीट सोमय्यांवर कारवाई करु शकणार नाहीत.
मेधा सोमय्या (Medha Somaiya) आणि नील सोमय्या यांच्यावर कारवाई करु शकणार नाहीत.
कारण घोटाळे उद्धव ठाकरे करतात. जे डर्टी डझन घोषित केले आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार ते सांगा,
असे म्हणत श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांनी हवाला ऑपरेटरकडून पैसा ट्रान्सफर केला,
वरुण सरदेसाईचेही (Varun Sardesai) पुरावे समोर येत असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

 

Web Title :- Kirit Somaiya | even if uddhav thackeray becomes mumbai commissioner of police he cannot take action against me says kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Fasting Cause Weight Gain | उपवास करण्याने वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर ‘या’ 4 चूका असू शकतात कारण; जाणून घ्या

Phone Tapping Case | IPS रश्मी शुक्लांनी 60 दिवस फोन टॅप केल्याची माहिती आली उजेडात

Urfi javed Bralette Photo | ‘फ्रंट ओपन’ टॉप घालून उर्फी जावेदनं सोशल मीडियावर लावली आग, व्हिडीओ पाहा पण काळजीपुर्वक

Home Remedies For Seasonal Allergies | बदलत्या हवामानासोबत वाढतोय अ‍ॅलर्जीचा त्रास, ‘हे’ घरगुती उपाय ठरतात ‘रामबाण’; जाणून घ्या

 

Related Posts