IMPIMP

Pune Police Crime News | पुणे पोलिस क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – अजय विटकरसह 29 जणांवर MCOCA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 23 वी ‘मोक्का’ कारवाई

by nagesh
Pune Crime News | Commissioner of Police Ritesh Kumar's 15th MPDA action so far against Pune Criminals; Action On Nitesh Sadbhaiya of Vishrantwadi Police Station limits

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Crime News | चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या (Chaturshringi Police Station) हद्दीत संघटीत टोळी तयार करून 19 वाहनांची तोडफोड करणार्‍या अजय विटकर आणि त्याच्या इतर 28 साथीदारांविरूध्द पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का MCOCA (Mokka Action) अंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Police Crime News)

 

रूपेश उत्तम विटकर (22, पांडवनगर), ईस्माईल इब्राहिम शेख (19, रा. पांडवनगर – Pandav Nagar, Wadarvadi, Pune), गणेश हरीचंद्र धोत्रे (19, रा. वडारवाडी), साहिल गणेश विटकर (20, रा. वडारवाडी), लवकुश रामाअधीन चौव्हाण (22, रा. पांडवनगर पोलिस चौकी जवळ), विजय उर्फ चपात्या हनुमंता विटकर (21, रा. वडारवाडी), चेतन उर्फ आण्णा राजु पवार (22, रा. वडारवाडी), अनिल उर्फ काळया हनुमंत डोंगरे (21, रा. गोखलेनगर – Gokhale Nagar), विजय चंद्रकांत विटकर (19, रा. वडारवाडी) आणि धनराज उर्फ चिम्या काळुराम धोत्रे (23, रा. वडारवाडी) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या 20 ते 22 साथीदारांचा शोध सुरू आहे. (Pune Police Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टोळीचा म्होरक्या अजय विटकरने काही सामाईक व काही नवीन साथीदारांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी निर्माण करून अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने अनेक गंभीर गुन्हे केला आहेत. त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, हत्यार बाळगणे आदी गंभीर गुन्हयांचा समावेश आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr PI Balaji Pandhare) यांनी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. प्रस्तावाची छाननी करून अजय विटकर आणि त्याच्या इतर 28 साथीदारांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी देखील आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode) करीत आहेत.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण (PI Ankush Chintaman), सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड (API Ratnadeep Gaikwad), पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक (PSI Nileshkumar Mahadik), पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके (PSI Rupesh Chalke), पोलिस अंमलदार अमित गद्रे, सुहास पवार आणि मारूती केंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :- Pune Police Crime News | MCOCA against 29 Criminals including Ajay Vitkar from Chatushringi Police Station, 23rd ‘Mokka’ action by Police Commissioner Ritesh Kumar

 

हे देखील वाचा :

Yashaswini Sanman Award | यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता 12 मे पर्यंत अर्ज करता येतील; खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

Maharashtra Govt Announcement | महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Bhiwandi Building Collapse | भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 40 जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला दाखवतो, माझी खुप मोठी ओळख आहे’ असे म्हणून त्यानं पकडली पोलिसाची कॉलर

 

Related Posts