IMPIMP

Pune Police | पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये ! धनकवडी परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगची काढली धिंड

by nagesh
Pune Police | Dhankawadi Balaji Nagar Sahakar Nagar Police Station police parade koyta gang accused on road in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Police | पुण्यातील धनकवडी परिसरात (Dhankawadi) कोयता आणि हत्यारे घेऊन (Koyta Gang In Pune) दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी (Pune Police) चांगलाच धसका दिला आहे. त्यामधील 6 गुन्हेगारांना अटक (Arrested) करुन त्यांची सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) बालाजीनगरमधून (Balaji Nagar) धिंड काढली आहे (Pune Crime). धनकवडी भागातील नागरिकांमधील भीती कमी व्हावी आणि परत गुन्हेगारांकडून अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी आरोपींची त्याच भागातून वरात काढली आहे. (Pune Criminals)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर रविवारी (3 एप्रिल) रोजी गुंडांनी काही जणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी संबधित आरोपींना चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून आज (गुरुवारी) त्यांची धनकवडी भागातील बालाजीनगर येथून धिंड काढली. यामधील आरोपींनी यापूर्वी अनेक गुन्हे केलेले आहेत. 8 एप्रिलपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. (Pune Police)

 

दरम्यान, बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर परिसरात धारदार हत्यार हातात घेऊन दहशत पसरवली जात आहे.
हातात कोयते घेऊन नागरिकांवर हल्ले केले जाताहेत.
फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण केली जात आहे, पाया पडायला लावलं जात आहे आणि या घटनांचे व्हिडीओ शूट करुन दहशत पसरवली जात आहे.
अशा नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या.
मात्र, पुणे पोलीस कडक कारवाई करत नसल्याचा आरोपही नागरिकांमधून केला जात होता.
यानंतर आता पोलिस अँक्शन मोडमध्ये आले आहेत.
थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या आदेशानंतर वरिष्ठ पोलिसांसह पोलीस पथकांनी आरोपींना चांगलांच दणका दिला आहे.

 

Web Title :- Pune Police | Dhankawadi Balaji Nagar Sahakar Nagar Police Station police parade koyta gang accused on road in pune

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनो 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हा – उच्च न्यायालयाचे निर्देश

Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले – ‘या देशासाठी तुमचं योगदान काय?’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! तरुणीला घरात शिरुन दिले सिगारेटचे चटके; घडला प्रकार हिंंजवडीत, तक्रार बंडगार्डनला, चौकशीत खरा प्रकार आला समोर

 

Related Posts