IMPIMP

Pune Police Independence Day | मुंढवा पोलीस ठाण्यात अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा, रिक्षाचालकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव

by sachinsitapure
pune-police-independence-day-celebrating-independence-day-in-a-unique-way-at-mundhwa-police-station-rickshaw-pullers-were-honored-with-badges-of-honour

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Independence Day | पुणे शहरात मंगळवारी (दि.15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील (Pune Police Commissionerate) मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) मोठ्या उत्साहात, देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. (Pune Police Independence Day) स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंढवा पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने संपूर्ण पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मुंढवा पोलीस ठाण्यात 77 वा भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण (Flag Hoisting) करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, व्यख्याता व माईंड पॉवर ट्रेनर (Mind Power Traine) दत्ता कोहिनकर (Datta Kohinkar) उपस्थित होते. तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक, समाजसेवक, विद्यार्थी, आझाद रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफिक पटेल व रिक्षा चालक उपस्थित होते. (Pune Police Independence Day)

 

कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या रिक्षा चालकांनी नियमांचे पालन, पीडित नागरिकांना मदत, प्रवासा दरम्यान रिक्षामध्ये विसरलेल्या मौल्यवान वस्तू प्रामाणीकपणे परत देणे अशी कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या रिक्षाचालकांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे व दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय पोलीस ठाण्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांना पारितोषीक देऊन सन्मानीत करण्यात आले.

तसेच मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संदीप पाटील (Sandeep Patil) व गायक स्वप्निल सुर्वे
(Singer Swapnil Surve) यांनी देशभक्तीपर गाणी गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित राहिल्याने सर्व धर्मीय एकोपा पाहण्यास मिळाला.
नागरिक व पोलीस यांच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

हा कार्यक्रम पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख
(ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane),
पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे (PI Pradeep Kakade) सर्व अधिकारी व अंमलदार यांनी केला.

 

Related Posts