IMPIMP

New Housing Scheme | शहरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना घेता येणार हक्काचे घर; पंतप्रधान मोदींनी केली नवीन योजना घोषित

by sachinsitapure
New Housing Scheme | government will soon launch scheme for people living rent to have their own house says pm modi

सरकारसत्ता ऑनलाईन – देशातील शहरी भागामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवीन गृहनिर्माण योजना (New Housing Scheme) घोषित केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर ही योजना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन जाहीर केली. त्यांच्या या नवीन योजनेमुळे शहरातील भाडेकरी म्हणून राहणाऱ्या सामान्य लोकांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकारता येणार आहे. सर्व लोकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, नवीन योजनेमुळे (New Housing Scheme) बँकेच्या महागड्या व्याजदरातूनही मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधताना पंतप्रधान मोदी (PM Modi From Lal Killa) म्हणाले की, देशामध्ये मोठी लोकसंख्या अशी आहे जी शहरी भागांमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत आहे. याच मध्यमवर्गीय लोकांचे शहरामध्ये नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार व्याज अनुदान योजना सुरू करणार आहे. त्यांनी सांगितले की, देशातील लाखो कुटुंबांना घरे खरेदी करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी लवकरच सरकार कर्ज व्याजात सवलत देणारी योजना सुरू करत आहे. याचा थेट फायदा लहान घरे, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणार्‍या कुटुंबांना घेता येणार आहे. लोककल्याणकारी ही सब्सिडी स्कीम लवकरात लवकर नागरिकांसाठी सुरू करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.

सध्या अस्तिवात असणारी प्रधानमंत्री आवास योजनेचा (Pradhan Mantri Awas Yojana) देखील लोक
मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेत आहेत. शहरामध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबासाठी पंतप्रधान आवास योजना (PMAY-U) 25 जून,
2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केली होती. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जारी
केलेल्या आकडेवारीनुसार, सरकारने 31 जुलै 2023 पर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 118.90 लाख
घरांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी 76.02 लाख घरे लाभार्थ्यांना देण्यात आली असून उर्वरित घरांचे काम सुरू आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की PMAY-U च्या क्रेडिट-लिंक्ड सबसिडी योजनेअंतर्गत, देशातील गरीब वर्गाला
6.5 टक्के व्याजदरात सूट मिळते. अशा परिस्थितीत, प्रत्येक कुटुंबानुसार, लाभार्थ्यांना एकूण 2.67 लाख रुपयांचा लाभ
मिळू शकतो. आता ही नवीन गृहनिर्माण योजना (New Housing Scheme) देखील लाखो गरीब कुटुंबांना
त्याचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

 

Related Posts