IMPIMP

Pune Police MCOCA Action | विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणार्‍यांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 93 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
Pune Police MCOCA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MCOCA Action | शिवीगाळ व दमदाटी करुन हातातील कोयता हवेत फिरवून विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या अक्षय नवगिरे व त्याच्या साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 93 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी अक्षय राजु नवगिरे (वय-25 रा. गोकुळनगर, धानोरी), आकाश शिवशंकर विश्वकर्मा (वय-21 रा. परांडे नगर, धानोरी) यांच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 326, 323, 504, 506, 34 आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 19 नोव्हेंबर रोजी मुंजबा वस्ती येथे रात्री घडला होता. (Pune Police MCOCA Action)

टोळी प्रमुख अक्षय राजु नवगिरे याचे पूर्वीचे रेकॉर्डची पाहणी केली असता, त्याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याच्या साथीदारासह गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी विश्रांतवाडी, येरवडा (Yerwada Police Station), विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) परिसरात खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)
(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे
सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास
मान्यता दिली. पुढील तपास खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat),
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर
(Senior PI Dattatraya Bhapkar), पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे (PI Bhalchandra Dhavale),
पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम (PSI Shubhangi Magadum), सत्यावान गेंड (PSI Satyawan Gend)
सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार मनोज शिंदे, सुनिल हसबे यांच्या पथकाने केली.

Related Posts