IMPIMP

Pune Police MCOCA Action | पर्वती भागात दहशत माजविणाऱ्या संकेत लोंढे व त्याच्या इतर 6 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 53 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
Pune Police MPDA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MCOCA Action | बहिणीला छेडल्याच्या कारणावरुन एकावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन पर्वती परिसरात दहशत पसरवणाऱ्या संकेत देविदास लोंढे व त त्याच्या 6 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 53 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

टोळी प्रमुख संकेत देविदास लोंढे (वय-20 रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे), टोळी सदस्य प्रतिक उर्फ बिट्या पांडुरंग कांबळे (वय-20 रा. चुनभट्टी, सिंहगड रोड, पुणे), अजित उर्प आज्या संजय तायडे (वय-20 रा. जनता वसाहत, पुणे), शुभम दिगंबर गजधने (वय-19 रा. दांडेकर पुल, पुणे) तसेच तीन विधिसंघर्षीत बालक यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

फिर्यादी हे दांडेकर पुल (Dandekar Bridge) येथील रामकृष्ण मठा जवळ शतपालवी करत असताना संकेत लोंढे, प्रतिक कांबळे, अजित तायडे, शुभम गजधने व इतर तीन अल्पवयीन मुले (Minors) त्यांच्या जवळ आले. त्यापैकी एका अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांना तु व तुझा मित्राने माझ्या बहिणीला का छेडले असे म्हणत त्यांची कॉलर पकडून मारहाण (Beating) केली. तर इतरांनी शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी अल्पवयीन मुलाने धारदार हत्यार काढून भाई लोकांना शिवी देतो का, तुला खल्लास करतो असे म्हणत गळ्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. त्यावेळी फिर्यादी यांनी तो वार चुकवला.

त्यानंतर फिर्यादी राहत असलेल्या वसाहतीमध्ये जाऊन कोयते हवेत फिरवून पोलिसांत तक्रार केली तर एक-एकाचा मर्डर करण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati (Dattawadi) Police Station) आयपीसी 307, 452, 143, 144, 147, 148, 149, 323, 504, 506, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

आरोपी संकेत लोंढे याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन मागील 10 वर्षात खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दुखापत किंवा हल्ला, हल्ल्याची तयारी करणे, गृह अतिक्रमण, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

पर्वती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Senior PI Jairam Paigude)
यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम
प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale) करीत आहे.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 53 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा,
सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे,
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (PI Vijay Khomane), उप निरीक्षक जगदाळे (PSI Jagdale),
पोलीस अंमलदार दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांनी केली.

Related Posts