IMPIMP

Pune Police MPDA Action | वानवडी परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 98 वी कारवाई

by sachinsitapure
Pune Police MPDA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार अमन अझीम शेख (वय-22 रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 98 वी कारवाई आहे. (Pune Crime News)

अमन शेख हा वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, चाकू, तलवार यासारख्या हत्यारासह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील तीन वर्षात त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

अमन शेख याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी अमन शेख याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Pune Crime News | पुणे : तरुणीला मारहाण करुन अंगावरील कपडे फाडले, सात जणांवर FIR

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा

Pune Crime News | पुणे : मुलीवर अत्याचार करुन उकळले पैसे, लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर FIR

Related Posts