IMPIMP

Pune Police MPDA Action | जनता वसाहत मधील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 96 वी कारवाई

by sachinsitapure
IPS Ritesh Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार शुभम प्रमोद शिंदे (Criminal Shubham Pramod Shinde) (वय- 26 रा. मध्यवर्ती मंडळाजवळ, जनता वसाहत, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 96 वी कारवाई आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

शुभम शिंदे हा पर्वती पोलीस ठाण्यातील (Parvati Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने विश्रामबाग व पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चाकू, कोयता, यासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी शुभम शिंदे याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पोलीस आयुक्त यांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुभम शिंदे याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह (Nagpur Central Jail), नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

ही कमगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Related Posts