IMPIMP

Pune Police Inspector Transfers | पुणे पोलीस आयुक्तालयातील 17 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

गुन्हे शाखा, फरासखाना, खडक, विश्रामबाग, कोथरुड, अलंकार, वारजे माळवाडी, सिंहगड रोड, खडकी, भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

by sachinsitapure
Pune Police Inspector Transfer

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Inspector Transfers | लोकसभा निवडणूक-2024 च्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभुमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पोलीस आयुक्तालयातील 17 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.24) काढले आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत.

बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कुठून कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे…

1. दादासाहेब बाबुराव चुडाप्पा (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)
2. सुनिल बाबुराव माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा Technical Analysis Wings (T.A.W)
3. रविंद्र मनोहर गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन)
4. दिपाली सचिन भुजबळ (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस स्टेशन (बदली आदेशाधिन) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन)
5. हेमंत चंद्रकांत पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा)
6. संदिप नारायण देशमाने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अलंकार पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड पोलीस स्टेशन)
7. सुनिल पांडुरंग जैतापुरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन ते कोर्ट कंपनी)
8. अक्षय चंद्रनाथ महाजन (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन ते पोलीसन निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)
9. विजय गणपतराव कुंभार (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा (अभियोग कक्ष) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन)
10. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, विशेष शाखा)
11. गिरीश विश्वासराव दिघावकर (पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन)
12. बालाजी अंगदराव पांढरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-3)
13. निलीमा नितीन पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन ते वाहतूक शाखा (बदली आदेशाधिन) ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा)
14. अश्विनी अनिल सातपुते (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा (अंमली पदार्थ विरोधी पथक-1) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन)
15. निलम शशिकांत भगत (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक, कोर्ट आवार)
16. श्रीहरी रामचंद्र बहिरट (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-3 ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अभियोग कक्ष)
17. राजेंद्र शावरसिद्ध लांडगे (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (अंमली पदार्थ विरोधी पथक-1)

पोलीस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन अजय कुलकर्णी व पोलीस निरीक्षक, (गुन्हे) चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन अंकुश चिंतामण हे पुढील आदेश होईपर्यंत अनुक्रमे वारजे माळवाडी व चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार पाहतील.

Pune Crime News | कानून के हात लंबे होते है ! फरार झालेल्या खुनातील आरोपीला 13 वर्षानंतर राजस्थानमधून अटक; चतु:श्रृंगी पोलिसांची कारवाई

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : लाईट गेल्याच्या रागातून महावितरण कर्मचाऱ्यांना बांबूने मारहाण

Related Posts