IMPIMP

Pune Police News | पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेतून 24 तास कर्तव्यावर असणार्‍या पोलिसांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव उपक्रम

by nagesh
Pune Police News | An innovative initiative for the holistic development of the children of policemen who are on duty 24 hours a day, conceptualized by Commissioner of Police Ritesh Kumar, Joint Commissioner of Police Sandeep Karnik

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या संकल्पनेतुन 24 तास कर्तव्यावर असणार्‍या पोलिसांच्या पाल्यांसाठी एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये पाल्यांसाठी 3 दिवसीय कार्यशाळेचे (3 Days Workshop for Children’s Of Pune Police) आयोजन करण्यात आले होते. (Pune Police News)

कार्यशाळेत एकुण 75 पोलिस दलातील कर्मचार्‍यांची मुले सहभागी झाली होती. 3 दिवसीय कार्यक्रमांमध्ये पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरूवात होप फॉर चिल्ड्रन फाऊंडेशनने (Hope For The Children Foundation) प्रात्यक्षिकांमधून मुलांचा सर्वांगीण विकास या आगळया-वेगळया कार्यक्रमाने झाली. ज्यामध्ये मुलांना वेगवेगळी कौशल्य विकसित करण्याचे तंत्र (Skill Development Techniques) शिकवण्यात आले. (Pune Police News)

Pune Police News | An innovative initiative for the holistic development of the children of policemen who are on duty 24 hours a day, conceptualized by Commissioner of Police Ritesh Kumar, Joint Commissioner of Police Sandeep Karnik

File Photo

कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवशी शिक्षणतज्ञ व समुपदेशक अनिल गुंजाळ (Counselor Anil Gunjal) यांचे
व्याख्यान झाले. त्यामध्ये आनंदाने कसे शिकुया आणि करिअरचे विविध पर्याय याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
ज्ञान प्रबोधिनी प्रशालातर्फे आठवी ते दहावीच्या मुलांची अ‍ॅपटीटयूट टेस्ट (Aptitude Test) घेण्यात आली.
ही टेस्ट ज्ञान प्रबोधिनी प्रशाला (Jnana Prabodhini Prashala) यांनी पुणे पोलिसांच्या पाल्यांसाठी विशेष सवलत देऊन उपलब्ध करून दिली.

Pune Police News | An innovative initiative for the holistic development of the children of policemen who are on duty 24 hours a day, conceptualized by Commissioner of Police Ritesh Kumar, Joint Commissioner of Police Sandeep Karnik

File Photo

तिसर्‍या दिवशी चाईल्ड सायकॉलॉजिस्ट डॉ. भूषण शुक्ला (Dr. Bhooshan Shukla) यांचे व्याख्यान झाले.
त्यांनी इमोशनल इंटेलिजन्स या विषयावर व्याख्यान दिले. यामध्ये मुलांनी स्वतःच्या भावना कशा
हाताळायच्या आणि यशस्वी कसे व्हायचे याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट हा आर्ट ऑफ लिविंग यांच्या मेडिटेशन (Art Of Living Meditation) सत्राने करण्यात आला.

Pune Police News | An innovative initiative for the holistic development of the children of policemen who are on duty 24 hours a day, conceptualized by Commissioner of Police Ritesh Kumar, Joint Commissioner of Police Sandeep Karnik

File Photo

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

झालेल्या 3 दिवसीय कार्यशाळेत 75 मुलांनी सहभाग नोंदविला आहे.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांसह होम फॉर चिल्ड्रन फाऊंडेशन,
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, आर्ट ऑफ लिविंग आणि इतर मान्यवर वक्त्यांनी मोलार्च सहकार्य केले.
पिनॅकल इंडस्ट्रीज (शिवाजीनगर, पुणे) Pinnacle Industries Ltd यांनी देखील सहकार्य केले.

Web Title : Pune Police News | An innovative initiative for the holistic development of the children of policemen who are on duty 24 hours a day, conceptualized by Commissioner of Police Ritesh Kumar, Joint Commissioner of Police Sandeep Karnik

Related Posts