IMPIMP

Pune Police News | राहत असलेल्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत; कोंढवा पोलिसांचे नागरिकांना आवाहन (Video)

by sachinsitapure
Pune Police News | cctvs should be installed at residences places of business kondhwa police appeal to citizens

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर (Pune Crime) नागरिकांनी राहत असलेल्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) लावावेत, असे आवाहन कोंढवा पोलीस ठाण्याचे (Kondhwa Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonwane) यांनी केले आहे. तसेच सोसायटीमध्ये येणारे झोमॅटो (Zomato), स्विगी (Swiggy), अमॅझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) चे डिलिव्हरी बॉय यांची नोंद सोसायटीच्या रजिस्टरला करावी.(Pune Police News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याशिवाय घरमालक (Home Owner) आणि भाडेकरू (Tenant) यांच्यात भाडेकरार (लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स-Live and License) झाल्यानंतर घरमालकांनी पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच मालमत्ता भाड्याने देणाऱ्या एजंट (Agent) यांनी देखील भाडेकरुची माहिती दिलेल्या नमुना फॉर्ममध्ये भरून पोलीस ठाण्यात द्यावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. (Pune Police News)

मालमत्ता भाड्याने देणाऱ्या एजंट आणि घरमालक यांनी भाडेकरुची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी,
अन्यथा त्यांच्यावर आयपीसी 188 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात येईल. याशिवाय सोसायटीचे चेअरमन, सेक्रटरी यांनी भाडेकरुचे पोलीस व्हेरिफिकेश (Police Verification) करणे गरजेचे आहे. पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरुंना सोसायटीत प्रवेश देऊ नये. तसे आढळून आल्यास प्रचलित कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे नागरिक आपले कर्तव्य निश्चितपणे पार पाडतील आणि पोलिसांना सहकार्य
करतील अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या संदर्भात बॅनर व पॅम्प्लेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये
असणाऱ्या सोसायटीच्या गेटवर लावण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली.

Web Title : Pune Police News | cctvs should be installed at residences places of business kondhwa police appeal to citizens

Related Posts