IMPIMP

Pune Police News | घरापासून दुरावलेल्या 2 चिमुकल्यांना मुंढवा पोलिसांनी मिळवून दिले आईबाबा

by sachinsitapure
Pune Police News | Mundhwa police have found the parents of 2 children who were away from home

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | घरापासून दुरावलेली तीन ते चार वर्षाची दोन मुले पुन्हा त्यांच्या आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात मुंढवा पोलिसांना (Pune Police News) यश आले. हरवलेली दोन मुलं सुखरुप मिळाल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी पालकांनी त्यांना जवळ घेत गळाभेट घेतली. पालकांनी यावेळी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीतील केशवनगर भागामध्ये शेजारी राहणाऱ्या चैताली संदीप मोरे Chaitali Sandeep More (वय-30) व सुधिर महादेव शिंदे Sudhir Mahadev Shinde (वय-32 रा. जनसेवा बँकेजवळ, पोटे हॉस्पिटल समोर, केशवनगर, पुणे) यांनी केशवनगर पोलीस चौकीत (keshav nagar police chowki) मल्हार संदीप मोरे (वय-4), रोहीत सुधीर मोरे (वय-3) हे दोघे घरासमोर खेळत असताना रस्ता चुकून कोठेतरी भटकले असल्याची तक्रार दिली.

त्यावेळी पोलीस चौकी मधील पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे (PSI Dhananjaya Gade) यांनी त्या दोघांना धिर दिला. तसेच मुलांची वय लक्षात घेता या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane) यांना माहिती देण्यात आली. ताम्हाणे यांनी या दोन मुलांचे फोटो पोलीस ठाणे तसेच नागरिकांच्या ग्रुपवर शेअर करुन मुलांचा शोधा घेण्याबाबत पोलिसांना आदेश दिले.

केशवनगर पोलीस चौकीतील पोलिसांच्या पथकाने शिवाजी चौक, पवार वस्ती, कुंभार वाडा,
नदीपात्र भाग व इतर भागात मुलांचा शोध घेतला. एक ते दीड तास मुलांचा शोध घेतल्यानंतर मुले कुंभारवाडा
नदीपात्राच्या परिसरात घाबरून भटकत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मुलांना पोलीस चौकीत आणले.
यावेळी पोलीस चौकीत असलेल्या पालकांना मुलांना पाहून डोळ्यातून आनंद अश्रू आले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन लहान मुले आई वडिलांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे (PI Pradeep Kakade) यांच्या सुचनेप्रमाणे
पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे, पोलीस अंमलदार सचिन बोराटे, प्रविण कोकणे, निलेश पालवे यांनी केली.

 

Related Posts