IMPIMP

Post Office | पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉजिटचे व्याजदर वाढले; गुंतवणूक करणे ठरणार फायदेशीर

by sachinsitapure
Post Office | post office recurring deposit saving scheme invest 5000 rupee per month and get 8 lakh after 10 year

सरकारसत्ता ऑनलाईन – प्रत्येक जण सुरक्षित आणि योग्य परतावा देणारी गुंतवणूक शोधत असतो. सुरक्षित गुंतवणूकीत पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) करण्यात येणाऱ्या गुंतवणूकीची देखील गणना होते. आपल्या देशामध्ये हा पोस्ट ऑफिसमधील सेव्हिंग स्कीम (Post Office Savings Scheme) एक लोकप्रिय गुंतवणूकीचा प्रकार आहे. यामधीलच एक असणारी रिकरिंग डिपॉजिटचे (Post Office Recurring Deposit) व्याज दर वाढवण्यात आले असून ही बाब गुंतवणूकदारांसाठी (Post Office) अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवण्यासाठी सामान्य लोक नेहमीच तयार असतात. मात्र आता व्याज दरामध्ये वाढ झाल्याने ही गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरणार आहे. अलीकडेच केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेवर गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या व्याजदरात सुधारणा केली असून वाढ केली आहे. रिकरिंग डिपॉझिट स्कीम मध्ये (Post Office Recurring Deposit Saving Scheme)काही ठराविक कालावधीनंतर ठराविक पैसे गुंतवले जातात. याला परतावा म्हणून व्याज दर (Post Office Interest Rates) दिला जातो. आधी पोस्ट ऑफिसमधील या रिकरिंग डिपॉजिटचा व्याज दर 6.2 टक्के होता तो वाढवून आता 6.5 टक्के करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर या तीमाही करिता हा व्याज दर 6.5 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या बचत योजनेत गुंतवणूक करणे आता अधिक फायदेशीर ठरले आहे.

केंद्र सरकार आपल्या बचत योजनेच्या व्याजदरांमध्ये दर तिमाही आधारावर सुधारणा करते. आता . जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नवीन व्याज दर करुन ते वाढवण्यात आले आहे. रिकरिंग डिपॉजिट स्कीममध्ये आपण एका वर्षासाठी किंवा दोन वर्षासाठी आपल्या सोयींनुसार गुंतवणूक करु शकतो. अगदी 10 वर्षांपर्यंत या स्कीममध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये 18 वर्षे पूर्ण असलेला कोणत्याही प्रौढ व्यक्ती गुंतवणूक करु शकतो. लहान वयाच्या मुलांसाठी त्यांचे पालक लहान मुलाच्या नावावर गुंतवणूक करु शकतात. याचबरोबर जॉईंट अकाऊंट देखील उघडता येते. या स्कीम अंतर्गत खाते उघडल्यास अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे हे नेहची सुरक्षिततेचे ठरते.
10 वर्षे दरमहा ठराविक रक्कम गुंतवून मोठा निधी जमा करता येऊ शकतो.
व्याजदर दर तीन महिन्यांनी सुधारित केले जातात, त्यामुळे परतावा हा वाढू किंवा कमी होऊ शकतो.
पण सध्या असलेल्या व्याजदर स्थिर राहिला तर मोठा फायदा होणार आहे.
जर तुम्ही दरमहा 5,000 रुपये निश्चित रक्कम जमा केली आणि ही प्रक्रिया पुढे 10 वर्षे सुरू ठेवली,
तर सध्याच्या 6.5 टक्के दराने तुम्हाला ठेवीवर व्याज 2.46 लाख रुपये मिळतील. 10 वर्षे जमा केलेली एकूण रक्कम
6 लाख रुपये 10 वर्षांनंतर 8.46 लाख रुपये मिळतील. दरम्यान जर व्याजदर वाढले तर त्याचा अधिकचा फायदा
देखील मिळणार आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट सुविधेवर कर्ज देखील मिळणार आहे.

 

Related Posts