IMPIMP

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

by nagesh
Electricity Theft In Pune Wagholi | Major electricity theft caught in Wagholi; Electricity theft of 1 crore 44 lakh was revealed in two incidents

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – महापारेषणकडून औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर वीजवाहिन्यांसाठी (Pune Power Supply Off) नवीन मनोरे उभारणीचे काम सुरू आहे. या कामाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम रविवारी (4 डिसेंबर) सकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे. त्यामुळे या कालावधीत शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात वीजपुरवठा (Pune Power Supply Off) बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महापारेषण कंपनीच्या गणेशखिंड ते चिंचवड, गणेशखिंड ते रहाटणी या अतिउच्च दाब 132 केव्ही वीज वाहिन्यांचे मनोरे आणि तारांमुळे औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे तो दूर करण्यासाठी नवीन मोनोपोल टॉवर उभारण्याचे पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम गुरुवारी पूर्ण झाले. यातील उर्वरित काम रविवारी पूर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी गुरुवारीदेखील शहराच्या काही भागातील वीजपुरवठा (Pune Power Supply Off) खंडित केला होता.

 

फर्ग्युसन कॉलेज रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग 1, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर,
लकाकी रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, वेताळबाबा चौक, राजभवन, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण,
काँग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, मंगला टॉकीज, आयआयटीएम,
कॅसल रॉयल टॉवर, काकडे मॉल, एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, शिमला ऑफिस,
सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पिटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, चित्रशाळा,
आपटे रस्ता, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज आणि गणेशवाडी परिसरात दोन तास वीजपुरवठा बंद राहणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Power Supply Off | power supply in shivajinagar and deccan areas off for two hours on sunday

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बिल्डरकडे खंडणी मागणाऱ्या सराईतास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

 

Related Posts