IMPIMP

Pune Rains | अतिवृष्टीमुळे पुण्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान; एकाचा मृत्यू, 20 हजार कोंबड्या मृत तर 83 घरे जमीनदोस्त

by nagesh
Pune Rain | Due to continuous rain, Muthela floods in Pune! Highest discharge of this season from Khadakwasla dam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Rains | सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून ८३ घरांची पडझड झाली आहे. याशिवाय एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून रस्ते, बंधारे वाहून गेले आहेत. तसेच नऊ जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली असून तब्बल २० हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे जिल्हा प्रशासनाकडून (Pune District Administrator) प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. (Pune Rains)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जिल्ह्यात १, ६ आणि ७ सप्टेंबर या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. जुन्नर तालुक्यातील आठ मंडळे, आंबेगाव, दौंड प्रत्येकी एक मंडळ, पुरंदर आणि मावळ प्रत्येकी तीन मंडळे, खेड सहा मंडळे, बारामती एक, तर इंदापूर दोन मंडळ अशा एकूण १०० मंडळांपैकी २५ मंडळांमध्ये जास्त पाऊस झाला आहे. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १८२ घरांचे नुकसान झाले असून दहा घरे पूर्णत: उध्वस्त झाली आहेत. तसेच ५३१४ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून लवकरच राज्य सरकारकडे भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. (Pune Rains)

 

दरम्यान, जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत ४१ घरांची पडझड झाली असून दोन शेळ्या, एक बोकड, आठ हजार कोंबड्या दगावल्या आहेत.
तसेच १०२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच मोरगावमधील खटकळी ओढ्यावरील बंधारा वाहून गेला आहे.
जुन्नर तालुक्यात सहा घरांचा पडझड झाली असून सोमतवाडी येथे पाच हजार कोंबड्या,
ओतूर येथे ६६०० आणि पिंपरी पेंढार येथे १२७५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
वेल्हा तालुक्यात २६ घरांची पडझड झाली असून एक जनावर दगावले आहे.
खेड तालुक्यात तीन घरांची पडझड झाली असून पुरंदर तालुक्यात सात घरांचे नुकसान झाले आहे.
तसेच तीन शेळ्या, दोन जनावरे आणि ४००० कोंबड्या दगावल्या आहेत.
या ठिकाणी १०७ हेक्टर, तर दौंड तालुक्यात १५२ हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Rains | Damage to crops on 5,500 hectares in Pune due to heavy rains; One person died, 20 thousand chickens died and 83 houses were destroyed

 

हे देखील वाचा :

Vedanta Foxconn Project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला – खा. सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | ‘हात पाय तोडून ‘मुळशी पॅटर्न’ करेन’, धमकी देऊन खंडणीची मागणी; हिंजवडी परिसरातील घटना

Irrigation Department | राज्यातील धरणांच्या जलाशयांच्या परिसरात 200 मीटर अंतरात पक्क्या बांधकामांना बंदी – पाटबंधारे विभाग

 

Related Posts